कर्करोग या जीवघेण्या आजाराचे निदान होण्यासाठी अनेक महागडय़ा चाचण्या कराव्या लागतात. ब्रिटीश शास्त्रज्ञांनी नवीन ‘ब्रेथलायझर’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान होण्यास मदत मिळणर असल्याचा दावा आतापर्यंतच्या संशोधना आधारे केला आहे. मात्र, कर्करोग पहिल्या टप्प्यातील असल्यासच हे तंत्रज्ञान कामकरू शकणार असल्याचे या शास्त्रज्ञांचे मत आहे. लवकरच हे तंत्रज्ञान विकसीत करून बापरात आणले जाणार असल्याचे या संशोधकांनी सांगितले आहे.
जगभर फुप्फुसाच्या कर्करोग्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ब्रिटनमध्ये तर सहापैकी एक जण कर्करोगाचा बळी ठरतोय. फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान होण्यापूर्वीच तो अधिक फोफावलेला असतो. त्यामुळे रुग्णांवर उपचाराच्या अवघड पध्दतींचा अवलंब करावा लागतो.
ब्रिटन स्थित हडर्सफिल्ड विद्यापीठाच्या संशोधक ‘ब्रेथलायझर’ हे नवीन यंत्र विकसीत करत आहे. या यंत्राच्या सहाय्याने फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान लवकर होणार असून, आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करता येतील असे संशोधकांचे मत आहे. परिणामी, अनेकांचे प्राण वाचू शकतील. या आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वीच त्याचे निदान व्हावे अशी या यंत्राची रचना आहे, असे हडरफिल्ड विद्यापीठाचे डॉ. रिचेल अर्ली यांनी सांगितले.
‘ब्रेथलायझर’ तंत्रज्ञान करणार फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान!
ब्रिटीश शास्त्रज्ञांनी नवीन ‘ब्रेथलायझर’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान होण्यास मदत मिळणर असल्याचा
First published on: 19-12-2013 at 02:36 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon breathalyser to detect lung cancer