जैविकदृष्ट्या बदल घडवून आणलेल्या प्रकाश संवेदनशील पेशी असलेला जेलसदृश्य पदार्थ त्वचेत सोडून मधूमेहावर उपचार करण्याचा प्रयोग शास्त्रज्ञ करीत आहेत.
मधुमेहावर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एका जेलसदृश्य पदार्थाचा शोध लावला आहे. जैविकदृष्ट्या बदल घडवून आणलेल्या प्रकाश संवेदनशील पेशी असलेले हे जेल त्वचेत सोडण्यात येते. प्रयोग करताना शास्त्रज्ञांनी प्रकाश निर्माण करण्यासाठी या जेलमध्ये दिव्याचा (light) वापर केला.
बोस्टन येथील हार्वड मेडिकल स्कुलचे मायुंग्व्हान चोई आणि त्यांच्या सहका-यांनी हे जेल तयार केले असून, प्रकाश संवेदनशील पेशींना निर्देश देणारे हे जेल प्रयोगासाठी उंदराच्या त्वचेत सोडण्यात आले. मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी चोई आणि त्यांच्या चमूने उंदराच्या डोक्याला जोडलेल्या फायबर ऑप्टिक केबलद्वारे दिवा (light) प्रज्ज्वलित केला. ‘न्यू सायंटिस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार इंन्सुलिनच्या स्रावाला चालना देणारे संयुग निर्माण करण्यासाठी या जेलमधील प्रकाश संवेदनशील पेशी उद्युक्त झाल्या आणि रक्तातील साखरेची (ग्लुकोजची) पातळी स्थिर ठेवली गेली.
अद्याप हे जेल प्राथमिक स्वरूपात असून, ते वापरण्यासाठी जास्तीत जास्त सुलभ व्हावे, या करिता चोई आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून वायरलेस ऊर्जा प्रकारावर चालणा-या मायक्रो-एलईडीचा वापर करण्याचा विचार करत असल्याचे चोई म्हणाले.

Story img Loader