गेली तीन वर्षे जगावर कोरोनाचे सावट होते. या महामारीने लाखो लोकांचा जीव गेला. सुरुवातील ताप, खोकला या सारखी लक्षणे असल्याने त्यास ओळखण्यास वेळ जात होता. मात्र कोरोनाचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या करण्यात आल्याने कोविड विषाणूला ओळखणे सोपे झाले. कालांतराने लसही उपलब्ध झाल्याने कोरोनाला वेसन घालणे शक्य झाले. पण या काळात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. २०१९ पासून कोरोनामध्ये अनेक परिवर्तन झाले आहेत. म्युटेशनमुळे त्याची लक्षणे देखील बदलली आहेत. पण आता घसा दुखणे (sore throat ) हे त्याच्या काही प्रमुख लक्षणांपैकी एक आहे.

सुरुवातीला चव जाणे, वास ओळखू न येणे आणि थकवा ही कोविडची काही सामान्य लक्षणे होती. मात्र अलिकडे २ तृतियांश लोकांमध्ये घसा दुखण्यापासून कोविड आजाराची सुरुवात होत आहे. सध्या ताप येणे आणि वास ओळखू न येणे ही लक्षणे फार कमी आढळून येत आहेत, अशी माहिती कोविड झोई अ‍ॅपचे सहसंस्थापक टीम स्पेक्टर यांनी दिली.

(अधिक तहान लागणे ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला)

कोविड सोअर थ्रोट कसे ओळखावे?

घसा दुखणे (covid sore throat) हे घशाच्या इंतर संसर्गाप्रमाणेच असते. परंतु, जेव्हा तुम्हाला कोविड होते तेव्हा, तुम्हाला जेवणाचा घास घेताना घशामध्ये वेदना, खवखवणे आणि घसा जाड झाल्यासारखे वाटेल. रुग्णांना घशात कोरडेपणा जाणवू शकतो, सूज झाल्याने त्यांना असे वाटू शकते.

कोविड सोअर थ्रोचची वैशिष्ट्ये काय?

  • आजाराच्या पहिल्या आठवड्यात कोविड सोअर थ्रोट होते. आणि ते लवकर बरे देखील होते.
  • संसर्गाच्या पहिल्या दिवशी ते अधिक त्रासदायी वाटते, मात्र पुढील प्रत्येक दिवशी ते बरे होत जाते.
  • सोअर थ्रोट हे ५ दिवसांपेक्षा अधिक काळ टिकत नाही.
  • ज्यांना पाच दिवसांपेक्षाही अधिक काळ सोअर थ्रोटची समस्या असेल त्यांनी डॉक्टरांना दाखवावे.

कोविडची लक्षणे कोणती

ताप, थकवा, सर्दी, शरीर आणि स्नायू दुखणे, चव आणि गंधाची ओळख न पटणे. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या जसे मळमळ, उलट्या, भूक न लागणे, अतिसार हे सर्व कोविडची लक्षणे आहेत.

Story img Loader