अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com

दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृती म्हटल्यावर आपल्यासमोर इडली, दोसे, भाताचे डोंगर आणि रस्सम् याशिवाय दुसरं काहीही येत नाही. पण निव्वळ खाण्यासाठी तमिळनाडूमध्ये फिरल्यावर समोर आलेलं चित्र वेगळं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईत साऊथ इंडियन खाणे आणि तामिळनाडूत जाऊन खाणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. यापूर्वीच्या तामिळनाडूच्या भटकंतीत तिथल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर शाखा असलेल्या सरवाना भवन, आनंद भवन इत्यादी हॉटेलांत खाऊन झालेले होते. त्यामुळे या वेळच्या भटकंतीत इतर खाण्याची ठिकाणे शोधायचे ठरवले. या वेळी पहिला मुकाम होता मराठय़ांची तिसरी राजधानी जिंजी. जिंजी चेन्नईपासून ९० किलोमीटरवर आहे. राजगड, रायगड या किल्ल्यांनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी तामिळनाडूतील जिंजी होती हेच बऱ्याच जणांना माहिती नसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत इसवी सन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांनी रायगडाला वेढा घातला.

५ एप्रिल १६८९ ला रायगडावरून निघालेले छत्रपती राजाराम महाराज मोगल सन्याला हुलकावणी देत तर कधी दोन हात करत २ नोव्हेंबर १६८९ ला जिंजीला पोहोचले. जिंजी या भक्कम बेलाग किल्ल्याला आपली राजधानी बनवून त्यांनी २६ डिसेंबर १६९८ पर्यंत नऊ वष्रे राज्यकारभार पाहिला. हा झाला इतिहास. त्याचा तर अनुभव घ्यायचाच होता. पण त्याचबरोबर दाक्षिणात्य खाद्यमोहीमदेखील करायची होती.

नवीन ठिकाणी गेल्यावर गाडीचा चालक, स्थानिक लोक यांच्याशी गप्पा मारल्या की तेथे मिळणारे स्थानिक खास पदार्थ आणि खाण्याच्या लोकप्रिय ठिकाणांची माहिती होते. पण तामिळनाडूत भाषेची मोठीच समस्या होती. त्यात जिंजीसारख्या आडरस्त्यावरच्या गावात िहदी- इंग्रजी बोलणारा मिळणे तसे कठीणच. तरीही नेटाने प्रयत्न करून मोडक्यातोडक्या िहदी इंग्रजीत  दोन नावं कळली. एसटी स्टॅण्डजवळचे वसंत आणि जेवणासाठी अन्नपूर्णा. एसटी स्टॅण्डसमोरचे वसंत हे कुठल्याही एसटी स्थानकासमोर असते तसे वाहते हॉटेल आहे. अशा ठिकाणी कुठलीही जाहिरात न करता गरमागरम, ताजे खायला मिळते.

इडली वडा आणि डोशाबरोबर अनलिमिटेड सांबार आणि चटणी. ताटली, काटे चमचे यांना फाटा. हॉटेलात शिरल्यावर तुम्ही कसलीही ऑर्डर देण्यापूर्वी तुमच्या समोर केळीचे आडवे पान आणि सांबार, चटणीचे मग आणून ठेवतात. त्यानंतर आपण मागितलेला पदार्थ पानात गरमागरम वाढतात. भरपेट नाश्ता झाल्यावर भरवीला तुपातला मसूरपाक हवाच आणि पितळेच्या वाटीपेल्यातून मिळणारी काफीसुद्धा. या हॉटेलाच्या काऊंटरजवळच्या काचेच्या शेल्फ कम फ्रिजमध्ये बंगाली मिठाया हारीने मांडून ठेवलेल्या होत्या.  पुरी आणि बटाटय़ाची भाजी आणि आता या बंगाली मिठाया साऊथ इंडियन हॉटेलात लोक आवडीने का खातात हा मला पडलेला प्रश्न आहे. पण त्याचा विचार न करता भटकंतीला निघालो. रात्रीचा दौरा जिंजीतल्या अन्नपूर्णा रेस्टॉरंटकडे वळवला. तिथे सकाळी बिर्याणीचा बोर्ड पाहिला होता. पण टेबलावर बसल्यावर कळले बिर्याणी सकाळीच मिळते. मग चिकन चेट्टीनाड आणि डोसा मागवला. इथेपण तेच, वेटरने टेबलावर डायरेक्ट केळीचे आडवे पान पसरले. त्यावर चिकन चेट्टीनाडबरोबर राक्षसी तव्यावर बनवलेला भला मोठा डोसा. एका डोशातच गार व्हायला झाले. अप्रतिम चवीचे चिकन आणि सोबत डोसा आणि अनलिमिटेड चटणी आणि सांबार, मग काय विचारता आडवा हात मारला. दिवसाचा शेवट रसपूर्ण झाला. पण सकाळच्या बिर्याणीत जीव अडकला होताच.

दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णगिरी किल्ला पाहून लगेच अन्नपूर्णा हॉटेल गाठले. कारण काल बिर्याणी खायची राहिली होती. चिकन बिर्याणीची ऑर्डर दिल्यावर ‘दिवसा फक्त चिकन बिर्याणी मिळते, नो राइस’ असे वेटरने सांगितले (मग बिर्याणी विदाऊट राइस कशी असेल याची उत्सुकता वाटली) वेटरने टेबलावर केळीचे आडवे पान अंथरले. चिकन बिर्याणी, दहीकांदा , टोमॅटो चटणी आणि पायसम् आणून दिल्यावर जीव केळीच्या पानात पडला. अजून काय हवं.. आडवा हात मारला. तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने जिंजीचा निरोप घेतला.

तामिळनाडूतील लोक बिर्याणीचे फॅन आहेत हे मला तरी नव्यानेच कळले होते. मग प्रत्येक गावात बिर्याणीचा बोर्ड असलेली हॉटेल्स आणि बिर्याणी हाऊस दिसायला लागली. मदुराईला िदडीगुल थलप्पाकट्टी ही हॉटेल्सची चेन मिळाली. नागास्वामी नायडू या माणसाने १९५७ मध्ये मदुराईजवळच्या िदडीगुल येथे आनंदा विलास बिर्याणी हॉटेल चालू केले. तो घालत असलेल्या पगडीवरून त्याला थलप्पा या नावाने ओळखले जाऊ लागले. ही बिर्याणी लोकांच्या पसंतीला उतरली आणि आज तो इंटरनॅशनल ब्रॅण्ड झाला आहे. मदुराईतले िदडीगुल थलप्पाकट्टी रेस्टॉरंट अत्याधुनिक आहे. सूप ते डेझर्ट सर्व प्रकार तिथे हजर होते. आम्ही त्यांच्या दालची या सुप्रसिद्ध बिर्याणीची चव घेतली. पण ती फारशी भावली नाही. कदाचित ब्रॅण्ड इंटरनॅशनल करायचा असल्याने त्यातला मुळचा ठसका / झटका हरवला असावा असं वाटून गेले. बाकी सूप ते डेझर्टच्या मेन्यूत काही विशेष आढळले नाही.

मदुराईच्या मीनाक्षी अम्मन मंदिराच्या मागच्या गल्लीत संध्याकाळी फिरताना एका घराच्या बाहेर एक अम्माचा स्टॉल दिसला. आपल्याकडे कोणत्याही लोकप्रिय वडापावच्या गाडीवर असते तशी स्थानिक लोकांची तिथे गर्दी होती. भाषेचा प्रश्न होता, पण पदार्थ ओळखीचे होते. मेदुवडे, डाळवडे  समोरच्या परातीत मांडून ठेवले होते. वर्तमानपत्राच्या कागदावर फक्त चटणीसोबत हे पदार्थ मिळत होते. आमचा उत्साह बघून अम्माने आम्हाला गरमागरम डाळवडे आणि मेदुवडे काढून दिले. तामिळनाडूतला शेवटचा पडाव होता कोडाई कनाल. गेल्या सात दिवसांत साऊथ इंडियन भरपूर खाऊन झालं होते. काहीतरी वेगळं खायची इच्छा होती. कोडाई कनालमध्ये आडबाजूला एका ऑथेंटिक तिबेटी रेस्टॉरंटची माहिती मिळाली. द रॉयल तिबेट रेस्टॉरंटमध्ये दर्शनी भागात दलाई लामांचा फोटो लावलेला होता. त्याच्या समोरच्या बाजूला ल्हासातल्या पॅलेसचा प्रचंड मोठा फोटो.  रेस्टॉरंटमध्ये पाच टेबलं दाटीवाटीने मांडलेली होती. आमच्याव्यतिरिक्त पाश्चात्त्य पर्यटकांचा भरणा होता. तिबेटी मेन्यूत अनेक प्रकारचे सूप, मोमोज, फ्राइड राइस, नूडल्स यांचा भरणा होता. मेन्यूतील बरीच नावं डोक्यावरून गेली. मोमोज आणि सूपने जेवणाची सुरुवात केली. वाफाळणारे मोमोज आणि गरामागरम सूप पिताच अंगातली थंडी पळून गेली. चाऊमेन, वॉनटॉन, फूयाँग याच्या अनेक डिशेस होत्या. अंडय़ाला कॉनटोनीज भाषेत फूयाँग म्हणतात. अंडय़ाचे विविध प्रकार यात होते. त्यांचा आस्वाद घेऊन मोर्चा अर्थात फ्राइड राइस आणि नूडल्सकडे वळवला. वाँटॉनमध्ये राइसचे वेगळे प्रकार होते त्याचा आस्वाद घेतला. एवढा आहार झाल्यावर आम्ही राहण्याच्या ठिकाणापर्यंत चालत जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून रॉयल तिबेट रेस्टॉरंट चालत १५ मिनिटांवर असल्याने आम्ही नेहमीप्रमाणे चालतच निघालो. आमचे हॉटेल तसे गावाबाहेर होते आणि ते तिबेटी रेस्टॉरंटपण आडबाजूला होते. भटकण्याची सवय असल्याने गुगल मॅप लावून चालत हॉटेलकडे निघालो.

साधारण रात्रीचे सव्वानऊ झाले असावेत. एक बाइकवाला समोरून आला आणि जवळ आल्यावर स्पीड कमी करून तो आलेल्या दिशेला हात दाखवून तामिळमध्ये काहीतरी बोलला आणि वेगात निघून गेला. तो काय बोलला ते आम्हाला कळले नाही. आम्ही वळणावरून पुढे गेलो तर समोर रस्त्यात दोन गवे उभे होते. गुडघ्यापर्यंत पांढरा सॉक्स घातल्यासारखे पाय, आडदांड देहयष्टी, मजबूत िशग हे सारं चंद्रप्रकाशात स्वच्छ दिसत होतं. आमच्यात आणि त्यांच्यात फारतर चार फुटांचे अंतर होते. आम्ही सर्वजण अचानक एकमेकांसमोर उभे ठाकलो होतो. (ते ठामपणे आणि आम्ही लटपटत्या पायाने ) आम्हाला बघून न बघितल्यासारखे करून त्यातला एक गवा रस्त्याच्या बाजूने वाहणारे पाणी किंवा त्या बाजूचं गवत खाण्यात दंग झाला. दुसरा गवा दमदार पावलं टाकत रस्त्याच्या मधून आमच्या दिशेने चालत येत होता. गव्यांबद्दल वाचलेल्या सर्व गोष्टी आम्हाला एकदम  आठवायला लागल्या. आम्ही तिघे एका रेषेत रस्त्याच्या कडेने चालत होतो. आमच्या बाजूला दरी होती, तर गव्यांच्या बाजूला डोंगराचा उतार. आमच्या पुढे दोन पर्याय होते. आल्या मार्गाने परत जायचे किंवा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले तसे आम्हीपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहायचं. आम्ही रस्त्याच्या खाली उतरून बाजूच्या झुडपांना घासत घासत हळूहळू पुढे चालायला सुरुवात केली. एका पॉइंटला आम्ही एकमेकांना क्रॉस झालो. त्याला फारतर दोन ते तीन मिनिटे लागली असतील, पण तो काळ युगासारखा वाटला.

मोकळ्या रानगव्यांचे एवढय़ा जवळून दर्शन आयुष्यात पहिल्यांदाच झाले होते. प्रसंगच असा होता की मोबाइल खिशात असूनही फोटो काढण्याचा धीर झाला नाही किंवा त्या वेळी सुचले नाही. (त्याबद्दल आम्ही नंतर एकमेकांना दोष दिला ) पण हा प्रसंग आणि ते अचानक भेटलेले गवे मात्र आता कायमचे स्मरणात कोरले गेले आहेत.

दुसऱ्या दिवशी पुन्हा खादाडी आणि भटकंती सुरू झालीच. कोडाई कनाल हिल स्टेशन असल्याने तिथे फॅन्सी रेस्टॉरंटचाच भरणा अधिक आहे. आमच्या चालकाशी गप्पा मारताना कळलं की, कोडाईमध्ये संजय होम फूड नावाची घरगुती खानावळ आहे. कोडाईला येणारे बहुतेक सर्व गाडय़ांचे चालक तेथेच जेवतात. घरगुती जेवण असल्याने त्रास होत नाही. आम्ही ती खानावळ शोधून काढली. खानावळीत तीन लाकडी टेबलं होती. बाजूलाच साधेसे किचन होते. मेन्यूमध्ये तीनच प्रकार व्हेज, चिकन आणि मटन थाळी. अर्थात थाळी नव्हतीच टेबलावर आडवं केळीचं पान पसरलेलं. सर्वप्रथम पानावर भरपूर भात वाढला, त्याच्या बाजूला मटण/ चिकन जाड रश्श्याची वाटी आणि पापड. पानाबाहेर रश्श्याचा जार. भात आणि रस्सा हवा तेवढा मिळत होता. फक्त चिकन आणि मटणासाठी अधिकचे पैसे लागणार होते. हा प्रकारच भन्नाट होता. दक्षिणेतल्या या खादाडी वारीची सांगता अशा मस्त जेवणाने व्हावी हे खूपच लक्षात राहणारे होते.
सौजन्य – लोकप्रभा