Indian Long Hair Secret : साऊथ इंडियन अभिनेत्री साई पल्लवीच्या काळेभोर, लांब सडक आणि घटदाट केसांचे सर्वचजण फॅन आहेत. यामुळे अनेक तरुणी तिच्याप्रमाणे हेअर केअर रुटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. तिचे काळेभोर केस पाहून आपलेही तिच्यासारखे केस असावे असे प्रत्येकीला वाटते. यामुळे आज आम्ही तुम्हाला साऊथ इंडियन अभिनेत्री साई पल्लवीसारखे लांबसडक, घनदाट केस करण्यासाठी सीक्रेट हेअर रेमेडी सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्हाला एका महिन्यात केसांमध्ये बदल दिसू लागेल.
साऊथ इंडियन हेअर मास्क कसा बनवायचा?
१) साऊथ इंडियन हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला १ चमचे तीळ, १ चमचे मेथीचे दाणे आणि १५ ते १६ कढीपत्त्याची पानं लागतील. आता हे सर्व साहित्य मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. नंतर हे मिश्रण एका छोट्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. यानंतर त्यामध्ये खोबरेल तेल मिसळा. शेवटी हा डब्बा ३ दिवस उन्हात ठेवा, त्यानंतर दर ३ दिवसांनी केस धुण्यापूर्वी ३ तास हे तेल लावा. हा उपाय फॉलो केल्यास केसांना चांगली मजबुती मिळेल तसेच ते काळेभोर, घटदाट आणि लांब सडक होतील.
इन्स्टाग्रामवरील life with Minsa नावाच्या इन्फ्लुएंसरने साऊथ इंडियन महिलांच्या लांबसडक केसांमागील सीक्रेट हेअर रेमेडीबाबत माहिती दिली आहे.
२) आवळाच्या पाण्याने केस धुणे किंवा त्याची पेस्ट हेअर मास्क म्हणून लावल्याने केस काळे होतात. त्यातील व्हिटॅमिन सी गुणधर्म केस आणि त्वचा दोन्हीसाठी चांगले आहेत. त्यात लोह भरपूर प्रमाणात असते जे केसांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.