शरीरात जास्त प्रमाणात असेलेलं कोलेस्ट्रॉल अनेक घटकांवर अवलंबून असतं. बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, वाढतं वय आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ज्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असतं, त्यांना हृदयरोग होऊ शकतो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर मात केली नाही आणि दिवसेंदिवस कोलेस्ट्रॉल प्रमाण वाढतच गेलं, तर तुम्हाला हृदय विकाराचा झटकाही येऊ शकतो.आरोग्यासंबंधीत काही चांगल्या सवयी तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करु शकतात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
खाण्यापिण्याकडे आणि योग्य जीवनशैलीकडे लक्ष न दिल्यास कोलेस्ट्रॉल वाढू शकते. शरीरात २ प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते ते म्हणजे एक चांगले आणि दुसरे वाईट. दुसरे जे वाईट असते त्याला LDL म्हणतात. खराब कोलेस्ट्रॉल शरीराला एक नाही तर अनेक प्रकारे हानी पोहोचवते. वाढणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात बदल करता येणे शक्य असते. आज आपण असे काही खाद्यपदार्थ जाणून घेणार आहोत ज्यांचे सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा : Hair Fall: केसगळतीने हैराण झाला आहात? तर वापरून पाहा ‘हे’ चार घरगुती हेअर मास्क
सोयाबीन
सोयाबीन किंवा सोया चंक्स वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. यापासून शरीराला सोया प्रोटीन मिळते हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसेच तुम्ही आहारात तुम्ही सोया दूध, टोफू आणि अन्य सोया प्रॉडक्ट्सचा समावेश देखील करू शकता.
ओट्स
ओट्सचा समावेश अनेकदा नाश्त्यामध्ये केले जातो. ओट्समुळे शरीराला खूप फायबर मिळते. ज्यामुळे पोट खूप वेळ भरलेले राहते. याचा फायदा वजन कमी होण्यास मदत होते. ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि कोलेस्ट्रॉलला रक्तात शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते.
फायबरयुक्त फळे
पेक्टिन हा एक प्रकारचा विरघळणारे फायबर आहे जे कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी फायबरयुक्त फळांचा समावेश आहारात करावा. सफरचंद, द्राक्षे, स्ट्रॉबेरी आणि संत्री लिंबूवर्गीय फळांमध्ये पेक्टिन असते.
ड्राय फ्रुट्स
हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही सुका मेवा देखील खाऊ शकता. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम, शेंगदाणे, अक्रोड यांसारख्या सुक्या मेव्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)