मुलांच्या संगोपनाच्या वेळी दिलेले संस्कारच त्याचे चांगले भविष्य घडवतात. त्यामुळे मुलांचे संगोपन ही मोठी जबाबदारी मानली जाते. सर्वच पालक आपल्या मुलांना सिघंगाळे भविष्य देण्याचा प्रयत्न करत असतात. पण अनेक वेळा परिस्थिती अशी असते की, इच्छा असूनही ते आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. त्यातच सध्याच्या जगात आई आणि वडील दोघेही नोकरी करतात. अशावेळी त्यांना आपल्या मुलांचे संगोपन करण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच मुलांना आई-वडिलांचा वेळ न मिळाल्याने त्यांच्यात न्यूनगंड, एकटेपणा किंवा अहंकार येतो, जो नंतर मोठी समस्या बनू शकतो. जाणून घेऊया अशा टिप्स ज्या नोकरी करणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलाचे सहज संगोपन करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
वडीलधाऱ्या लोकांसोबत राहा :
मुलांना एकटेपणा वाटू नये यासाठी त्यांना त्यांच्या आजी-आजोबांसोबत ठेवणे चांगले. याद्वारे तुम्ही मुलाबद्दल पूर्णपणे खात्री बाळगाल. तसेच मुलांना आपल्या आजी-आजीबची साथ तर मिळेलच, पण त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टीही शिकायला मिळतील.
चुकीच्या सवयींमुळे लागत नाही चांगली झोप; ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून दूर करा समस्या
मुलांची दिनचर्या निश्चित करा :
जर तुमचे मूल फारच लहान असेल तर तुम्ही त्याला आपल्या कामाच्या ठिकाणीही घेऊन जाऊ शकता. यामुळे त्याला तुमची सोबतही होईल आणि त्याला एकटेपणाही वाटणार नाही. परंतु मूल मोठे झाले असेल तर तुम्ही त्याच्यासाठी एक दिनचर्या निश्चित करू शकता. त्याला कधी अभ्यास करायचा आहे, कधी जेवायचे आहे, कधी खेळायचे आहे आणि कधी झोपायचे आहे, यासाठी एक वेळापत्रक निश्चित करा. मुलांचे सामान व्यवस्थित ठेवा, जेणेकरून ते त्यांची कामी व्यवस्थित करू शकतात. वेळोवेळी फोन करून मुलाचे हालहवाल विचारा.
घरी कॅमेरा लावा :
जर तुमचे मूल दिवसा घरात एकटे राहात असेल तर तुम्ही घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा आणि त्याचा अॅक्सेस दोन्ही पालकांच्या मोबाईलमध्ये असावा. यामुळे तुम्हाला कळेल की तुमचे मूल कधी काय करत आहे.
या उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय? भारतातील ही पाच ठिकाणं देतील सुट्टीचा सर्वोत्तम अनुभव
मुलाला परिस्थिती समजावून सांगा :
आजची मुलं खूपच समजूतदार असतात. तुम्ही त्यांचे मित्र बना. वेळ मिळाल्यावर त्यांच्यासोबत खेळा आणि मुलांना समजावून सांगा की तुम्ही इतकी मेहनत का करत आहात. मुलांना सांगा की ते पुढे गेले की तुमची मेहनत यशस्वी होणार आहे. यामुळे तुमच्या मुलाच्या भावना तुमच्याशी जोडल्या जातील आणि तो तुम्हाला आधार देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल.
सुट्टीच्यावेळी मुलांना आपला पूर्ण वेळ द्या :
तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर प्रयत्न करा की तुमची नोकरी ५ दिवसांची असावी. अशा परिस्थितीत तुम्हाला दोन दिवस कुटुंबासोबत घालवण्याची संधी मिळेल. या काळात मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. त्यांना फिरायला घेऊन जा, त्यांच्यासोबत खेळ खेळा आणि त्यांचे विचार ऐका. यामुळे मुलाला तुमच्याकडून काय हवे आहे हे देखील कळेल.