आजकाल लोक अनेकदा बाथरूममध्ये तासन्तास बसतात. अनेकांना टॉयलेट सीटवर बसून पेपर वाचण्याची सवय असते, तर अनेकजण तासन्तास मोबाईल फोन वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने तुमच्या शरीराला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, टॉयलेट सीटवर १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे धोकादायक आहे कारण असे अनेक जीव आहेत जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. हे आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक असतात. आपण जास्त वेळ टॉयलेट का बसू नये आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊया.
बॅक्टेरिया तुम्हाला आजारी बनवतात
टॉयलेटच्या आत आणि टॉयलेट सीटवर अनेक प्रकारचे धोकादायक जंतू असतात, जे साफ करूनही पूर्णपणे जात नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती टॉयलेटमध्ये पेपर किंवा फोन घेऊन अनेक तास बसते तेव्हा धोकादायक जंतू कागदावर आणि फोनला चिकटून राहू शकतात. त्यानंतर आपण फोन किंवा पेपर पुन्हा वापरतो. त्यामुळे हे बॅक्टेरिया सर्वत्र पसरतात. या दोन्ही सवयी तुम्हाला पुन्हा पुन्हा आजारी बनवू शकतात. त्यामुळे टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसू नका. तसेच, टॉयलेटला जाताना मोबाइल फोन किंवा पेपर वाचत बसू नका, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
मूळव्याध होऊ शकतो
तज्ज्ञांच्या मते, जे लोक टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसतात त्यांना मुळव्याध होण्याची शक्यता जास्त असते. याचे मुख्य कारण पाठीच्या खालच्या भागाच्या स्नायूंवर दीर्घकाळ येणारा ताण असल्याचे मानले जाते, ज्यामुळे मूळव्याध होऊ शकतो. मूळव्याधांमुळे केवळ तीव्र वेदना होत नाहीत तर भविष्यात याचा त्रासही होतो.
( हे ही वाचा: भारतातील ‘या’ रेल्वे स्थानकांची नावे ऐकून तुम्हालाही हसू येईल; मुंबईतील ‘या’ स्टेशनाचाही आहे सहभाग)
स्नायू कमकुवत होतात
जे लोक टॉयलेट सीटवर बराच वेळ बसतात, त्यांच्या पाठीचे आणि पोटाचे स्नायू सैल होतात. या स्थितीमुळे तुमच्या पायातील स्नायू कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसू नका.