Hair Care Tips: प्रत्येकाला जाड, चमकदार केस आवडतात, बरोबर? पण, आजकाल केस गळणे आणि पातळ होणे अगदी सामान्य झाले आहे. ताणतणाव, जीवनशैली, प्रदूषण आणि योग्य पोषक तत्वांचा अभाव यामुळे केस गळतीची समस्या उद्भवते. केसांना निरोगी ठेवण्यासाठी आपण शॅम्पूपासून ते तेलांपर्यंत सर्व प्रकारचा प्रयत्न करतो. मात्र, या सगळ्यापेक्षा एक छोटासा आहार मोठा बदल घडवू शकतो. पालेभाज्या खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. पालेभाज्यांनी आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांना दूर करण्यास यांची मदत मिळते. पालेभाज्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची भाजी पालक मानली जाते. हीच पालक केसांसाठी वरदान ठरू शकते. होय, पालक हे पोषक तत्वांनी भरलेले आहे, जे केवळ तुमच्या केसांसाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले पालक तुमच्या केसांना आवश्यक वाढ देऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जास्तीत जास्त लोक पालक उकडल्यानंतर त्याचं पाणी फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे पाणी पालकाच्या पानांपेक्षा जास्त फायदेशीर असतं. त्यात आरोग्याला फायदेशीर अनेक पोषक तत्व असतात. हिवाळ्यात पालकाची भाजी खाणं आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी चांगलं मानलं जातं. पण अनेकांना हे माहीत नाही की, पालकाचा वापर तुम्ही केसांची वाढ करण्यासाठीदेखील करू शकता. याने तुमची केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्याही नैसर्गिक पद्धतीने दूर होईल.

केसांच्या वाढीसाठी पालकाचे फायदे :

१. पालकच्या सेवनाने केसांची मुळे मजबूत राहतात आणि केस गळती कमी होण्यास मदत होते. तसेच, पालकामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते; ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटते आणि तुमचे केस मजबूत दिसतात. जे तुमचा रक्तप्रवाह नियंत्रित ठेवण्यास मदत करते, तुमच्या टाळूला भरपूर ऑक्सिजन मिळतो याची खात्री करते.

२. पालकातील फोलेट ॲसिड हे पेशींच्या वाढीसाठी महत्त्वाचे असते. फोलेटच्या कमतरतेमुळे केसांची वाढ मंदावते किंवा पातळ होऊ शकते, त्यामुळे ती पातळी कायम राखणे आवश्यक आहे. पालक तुमच्या केसांना हवे असलेले फोलेट मिळवणे सोपे करते.

३. व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असणे हे तुमच्या टाळूसाठी खूप मोठी गोष्ट आहे. पालकातील व्हिटॅमिन ए तुमच्या टाळूचे नैसर्गिक तेल आहे, जे केसांना आर्द्रता ठेवते आणि कोरडेपणा टाळते. यामुळे केसांच्या वाढीला चांगली चालना मिळते.

४. केसांची वाढ होण्यासाठी आयर्नची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि आयर्न हे पालकाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात असतं. आयर्नमुळे केसांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते आणि याने केस हेल्दी व मजबूत राहतात.

५. पालकातील अ‍ॅंटीऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फेमेटरी तत्वांमुळे डॅंड्रफ होत नाहीत. या डॅंड्रफमुळेच केस कमजोर होतात आणि तुटतात.

हेही वाचा >> गर्भधारणेनंतर साखरेचं सेवन मर्यादित ठेवल्यानं आई आणि बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होतात? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

पालकाची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी मानली जाते, कारण यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पालकाची भाजी शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते. पालकाच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते, कारण यात अल्फा लिपोइक अॅसिड असतं, जे इन्सुलिन सिक्रीशन वाढवतं.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spinach or palak benefits in hair growth and prevent hairfall why spinach is the secret to healthier fuller hair srk