भारतीय महाकाव्य रामायणासोबत श्रीलंकेचा अतुट असा संबध आहे. श्रीलंकेचा आणि रामायणाचा समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक संबंध आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, श्रीलंका हे रावणाचे राज्य होते, ज्याने रामायणातील नायक भगवान रामाची पत्नी सीताचे अपहरण केले होते. सीतेला वाचवण्यासाठी आणि रावणाचा पराभव करण्यासाठी भगवान रामाने हनुमान आणि सैन्याच्या सहाय्याने मोठे युद्ध केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंका रामायणातील घडमोडींची साक्ष देणाऱ्या खुणा पुन्हा विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि ज्यांना यात स्वारस्य आहे त्यांना सीतेच्या अस्तिवाची साक्ष देणाऱ्या स्वतंत्र खुणा देखील पाहता आहेत. यामध्ये सिगिरिया, अशोक वाटिका, आणि दिवुरुमपोला मंदिर यासारख्या अनेक लोकप्रिय आकर्षणांचा समावेश आहे. त्रिंकोमाली या प्रसिद्ध मंदिरातही रामयणाशी संबंधित अनेक मंदिरे आहेत. इतकेच नाही तर या बेटावरील व्यवहारांसाठी भारतीय रुपयाला (INR) परवानगी देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

सिगिरिया

श्रीलंकेत अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा रामायणाशी संबंध असल्याचे मानले जाते. श्रीलंकेतील काही लोकप्रिय रामायण मार्गांमध्ये सिगिरिया, राजा रावणाचा राजवाडा मानला जाणारा प्राचीन दगडी किल्ला यांचा समावेश होतो. असे म्हणतात की, ‘रावणाने सीतेला जवळच्या गुहेत, सिगिरिया खडकाच्या आसपास बंदिवासात ठेवले होते. हे श्रीलंकेतील सर्वात छायाचित्रित खुणांपैकी एक आहे!’

हेही वाचा : हेलीकॉप्टरमधून घेऊ शकता केदारनाथचे दर्शन, काय आहे हे IRCTCचे खास पॅकेज, जाणून घ्या

सिगिरिया, राजा रावणाचा राजवाडा मानला जाणारा प्राचीन दगडी किल्ला ( photo by Pixabay)

अशोक वाटिका

अशोक वाटिका, नुवारा एलिया शहरातील बाग, हे आणखी एक लोकप्रिय आकर्षण आहे. असे मानले जाते की, ही ती जागा होती जिथे रावणाने सीतेला बंदिवासात ठेवले होते. असे म्हणतात की, हनुमान येथे सीतेला भेटले आणि त्यांच्या उपस्थितीचे प्रतीक म्हणून तिला प्रभू रामाची अंगठी दिली.

एला फॉल्स, श्रीलंका (Unsplash)

रावण एला फॉल्स आणि दिवुरुमपोला मंदिर

त्यानंतर या यादीत रावण एला फॉल्स आहे. एला गावातील हा धबधबा, सीतेला पळवून नेल्यानंतर रावणाने तिला लपवले होते, असे मानले जाते. आणि दिवुरुमपोला मंदिर, हे बंदरवेला शहराजवळील एक मंदिर आहेय असे मानले जाते येथे सीतेची शुद्धता सिद्ध करण्यासाठी अग्निपरिक्षा घेण्यात आली होती.

हेही वाचा- चार दिवस फिनलँडमध्ये फिरा, आनंदी कसे रहावे शिका सर्व काही मोफत! फक्त अट इतकीच आहे की…

त्रिंकोमालीमधील कोनेश्वरम मंदिर

त्रिंकोमाली या प्रसिद्ध मंदिर शहरात अनेक मंदिरे आहेत जी एक ना एक प्रकारे रामायणाच्या पाऊलखूणा मागे सोडतात. कोनेश्वरम मंदिर हे असेच एक मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या सन्मानार्थ रामाने बांधले असे मानले जाते.

श्रीलंकेतील अनेक रामायण-संबंधित ठिकाणांची ही काही उदाहरणे आहेत. रामायणाने श्रीलंकेच्या संस्कृतीवर खोलवर छाप सोडली आहे आणि अनेक स्थानिकांना त्यांचे महाकाव्याचे ज्ञान प्रवाशांना सांगण्यात अभिमान वाटतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka is in the process of recreating the ramayana trail visitors may be allowed to use indian rupee snk
Show comments