आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. स्टार हेल्थने करोनाच्या काळात ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना ही सेवा मोफत आणि घरी बसून वापरता यावी यासाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांचा वेळही वाचणार आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून स्टार हेल्थचे ग्राहक एंड-टू-एंड सेवेचा लाभ घेऊ शकतात. कॅशलेस क्लेम दाखल करण्यापासून, ग्राहक मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक कामं चुटकीसरशी पूर्ण करू शकतात. व्हॉट्सअॅपवरील ही सेवा ग्राहकांसाठी नेहमीच सुरक्षित राहील. व्हॉट्सअॅप मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे एन्क्रिप्शन हे सुनिश्चित करते की ग्राहकांसोबत शेअर केलेले तपशील सुरक्षित राहतील. याशिवाय, स्टार हेल्थचे ग्राहक कंपनीच्या चॅट असिस्टंट – ट्विंकल, कस्टमर केअर नंबर, एजंट, अधिकृत वेबसाइट, शाखा कार्यालय आणि स्टार पॉवर अॅपद्वारे विमा कंपनीपर्यंत पोहोचू शकतात. कंपनीने सांगितलेल्या नियमांनुसार, व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकच मेसेज पाठवायचा आहे.
स्टार हेल्थची ग्राहकांसाठी नवी सेवा; आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून क्लेम करु शकता, जाणून घ्या
स्टार हेल्थने करोनाच्या काळात ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही सेवा सुरू केली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-01-2022 at 10:27 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star health insurance service on whatsapp rmt