पहिल्यांदा वर्कआउट करण्यासाठी जिममध्ये जाताना मनात एक भीत असते की आपल्याला जमेल ना. यात जर आपण शरीराने खूपचं बारीक असून तर जिम करताना अजूनच दडपण येते. तरीही फिट राहण्यासाठी प्रत्येकाला योग्य वर्कआऊटचीची गरज असते. यात हल्लीच्या तरुण पिढीत फिटनेसची एक मोठी क्रेझ दिसून येत आहे, म्हणून अनेक जण कॉलेज जॉइंड करताच जिममध्ये जाणे सुरु करतात. पण तुम्ही पहिल्यांदाच जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी जात असाल तर काय करावे काय करु नये या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. जाणून घेऊ त्याबद्दल.
काय करावे
१) वर्कआउट करण्यामागे एक गोल सेट करा.
जिम जाइंट करण्यामागे तुमचे एक उद्दिष्ट असेलचं.. हे उद्दिष्ट वजन कमी करण्याचे, वाढवण्याचे किंवा फिट राहण्याचे असू शकते. यापैकी तुम्ही सेट केलेल्या गोलमुळे तुम्हाला वर्कआऊट करण्यासाठी एक मोटिव्हेशन मिळत राहील.
२) वॉर्मअप आणि कूल डाऊन करा.
जिममध्ये वर्कआऊटपूर्वी वॉर्म अप करणे गरजेचे आहे, कारण यामुळे वर्कआऊट करताना तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि स्नायूदुखी कमी करण्यास मदत होईल. वॉर्मअपमध्ये कार्डिओ आणि डायनॅमिक स्ट्रेच केले पाहिजेत. तर कूलडाऊनमध्ये स्टॅटिक स्ट्रेच आणि हलक्या मूव्हमेंट केल्या पाहिजेत.
३) वर्कआऊटसाठी ट्रेनरची मदत घ्या.
शारीरिक दुखापती टाळण्यासाठी आणि वर्कआऊटमधून फिट बॉडी बनवण्यासाठी योग्य ट्रेनिंगची गरज असते. यामुळे वर्कआऊट करताना तो योग्य प्रकारचे केला पाहिजे अन्यथा त्याचा काहीच फायदा होत नाही. तुम्हाला ज्याप्रकारे बॉडी बनवायची आहे, त्याप्रकारे ट्रेनिंग घेतले पाहिजे. यासाठी तुम्हाला जिम ट्रेनर चांगल्याप्रकारे गाईड करले तुम्ही त्याची मदत घ्या.
४) शरीर हायड्रेटेड ठेवा
वर्कआऊटमुळे खूप घाम येतो ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते. अशा परिस्थितीत शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खूप पाणी प्या. वर्कआउट करण्यापूर्वी नंतर ठरावीक वेळेने पाणी पिणे महत्वाचे आहे.
काय करु नये
१) जास्त वर्कआउट करु नका.
जिममध्ये पहिल्यांदा जातो तेव्हा प्रत्येकामध्ये तासांतास वर्कआऊट करण्याचा एक उत्साह असतो. परंतु एकाच दोन दिवस जिममध्ये वर्कआऊट करून शरीर फिट होत नसते. त्यामुळे जिममध्ये जाण्याचा टाईम आणि तिथे गेल्यानंतर कोणत्या वर्कआऊटसाठी किती वेळ द्यायचा हे ट्रेनरकडून माहिती करुन घ्या. कारण अनेकदा चुकीच्या वर्कआऊटमुळे शारीरिक दुखापतीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यासाठी तुम्ही वर्कआउट शेड्यूलत तयार करा ज्यात प्रत्येक वर्कआऊट प्रकारचा वेळ, दिवस निश्चित करा.
२) आठवड्यातून एक दिवस वर्कआऊट करणे टाळा.
कोणत्याही फिटनेस रुटीनमध्ये विश्रांती आणि रिकव्हरी खूप गरजेची असते. वर्कआऊटनंतर शरीराला रिलॅक्स ठेवण्यासाठी आणि पुन्हा तयार होण्यासाठी वेळ देणे महत्वाचे आहे. विश्रांती न घेता ओव्हरट्रेनिंग घेतल्याने शरीराला दुखापत होऊ शकते. तुमच्या शरीराला रिलॅक्स ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान एक ते दोन वर्कआऊट करणे टाळा.
३) स्वत:ची तुलना इतरांशी करु नका.
प्रत्येकाची वर्कआऊट बॉडी आणि खाण्यापिण्याची पद्धती वेगळ्या असतात. अनेकदा जिममध्ये गेल्यानंतर इतरांची फिट बॉडी पाहून आपल्याला आपण किती कुरुप आहोत असे वाटू लागते. स्वतःची इतरांशी तुलना केल्याने निराशा आणि निरुत्साहाची भावना निर्माण होऊ शकते. अशावेळी तुम्ही तुमच्या वर्कआऊटकडे लक्ष देत आपल्याला कसं चांगल फिट राहता येईल याकडे फोकस करा.
४) खाण्याकडे दुर्लक्ष करु नका.
वर्कआउट्सदरम्यान तुमच्या संपूर्ण शरीराला योग्यप्रकारे चालना देण्यासाठी योग्य पोषक आहार आवश्यक आहे. तुमच्या आहारात प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांचा योग्य समतोल आहे याची खात्री करा. तुमच्या फिटनेस उद्दिष्टांपर्यंत पोहचण्यासाठी आहारात काय खावे, काय खाऊ नये हे आहार तज्ज्ञांना विचारून घ्या.
तुम्ही या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला वर्कआऊट करुन पाहिजे तशी बॉडी बनवता येते, फिट राहता येते. पण जिममध्ये वर्कआऊट करताना कोणत्या मशीनचा कसा वापर करावा याचे ट्रेनरकडून योग्य ट्रेनिंग घ्या. माहित नसलेल्या गोष्टी आपल्या मनाने करण्याचा प्रयत्न करू नका.