ऋतू कोणताही असला तरी घरात डास हे नेहमीच येत राहतात. विशेषत: पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. यात तुमच्या घराच्या आजूबाजूला अस्वच्छता असेल तर डासांची संख्या आणखी वाढते. यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढतो परिणाम काही लोकांना जीवही गमवावा लागतो. अशावेळी डासांपासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डासांचा १०० टक्के नायनाट करण्याचा दावा करणारी अनेक औषधे बाजारात अगदी महागड्या किंमतीत विकली जातात. पण या औषधांचा परिणाम हा काही तासांपुरतीच मर्यादीत असतो शिवाय या औषधांमुळे घरातील वृद्ध व्यक्ती आणि लहान बाळांना त्रास होतो. त्यामुळे काही न करता अनेक जण डासांबरोबरच जगणे शिकतात. पण हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकते. यामुळे आम्ही तुम्हाला डासांपासून सुटका मिळवण्यासाठी अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय करुन तुम्ही डासांपासून आराम मिळवू शकता.

१) डासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय

१) एक रिकामी रिफिल बाटली
२) २ चमचे कडुलिंबाचे तेल
३) ४- ५ लहान कापूर गोळ्या

अशाप्रकारे बनवा डासांना दूर करणारे लिक्विड

१) सर्वप्रथम कापूरची बारीक पावडर करून घ्या.
२) आता रिफिल बाटलीत कडुलिंबाचे तेल भरा, ३) त्यात तुम्ही थोडे खोबरेल तेलही टाकू शकता.
४) यानंतर रिफिल बाटलीत कापूर पावडर भरा आणि झाकण लावून हिटिंग मशीनमध्ये लावा.

२) डासांचा नायनाट करणारा घरगुती उपाय

१) टरपेंटाईन तेल
२) कापूर

डासांपासून बचाव करण्यासाठी बनवा घरगुती उपाय

१) सर्वप्रथम १० ते १५ कापूर गोळ्या बारीक करा.
२) आता त्यात ६ ते ७ चमचे टरपेंटाईन तेल चांगले मिसळा.
३) यानंतर रीफिल बाटलीत भरा आणि हिटिंग मशीनमध्ये फीट करा. अशाप्रकारे तुम्ही घरातील डासांचा नायनाट करु शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Step by step guide to make mosquito repellent liquid at home sjr
Show comments