गेले शतकभर मानवाच्या मनात ‘मच्छर’भीती निर्माण करणाऱ्या मलेरियावर रामबाण उतारा निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मलेरियाचा परोपजीवी जंतू एका माणसातून दुसऱ्या माणसात कसा पसरतो याचे कोडे उलगडण्यात यश असून त्यामुळे मलेरियावर नवीन औषध योजना शक्य होणार आहे.
मलेरियामुळे दरवर्षी २० कोटी लोक आजारी पडत असतात, त्यात रूग्ण दगावण्याची शक्यताही जास्त असते. ब्रिटनमधील ग्लासगो विद्यापीठ व वेलक म ट्रस्ट सँगर इन्स्टिटय़ूट यांनी मलेरियाचा जंतू माणसातून डासात कसा जातो व त्याचे जीवनचक्र कसे पूर्ण होते याची प्रक्रिया शोधून काढली आहे. यामुळे या रोगाचा प्रसार थांबवणे शक्य होईल.
मलेरियाख्यान
मलेरिया हा ‘प्लास्मोडियम’ या परोपजीवीमुळे होणारा रोग असून डासांमार्फत तो पसरतो. जेव्हा डास प्लासमोडियम बाधित व्यक्तीला चावतो तेव्हा तो अगदी कमी प्रमाणात त्या रूग्णाचे रक्त घेतो त्यात मलेरियाचे परोपजीवी जंतू असतात. दोन आठवडय़ानंतर जेव्हा हा डास पुन्हा रक्त पितो तेव्हा या प्लास्मोडियमचे जंतू डासाच्या लाळेत मिसळतात व नंतर जेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला जाऊन चावतो तेव्हा प्लास्मोडियमचे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात जातात. मलेरियाच्या प्लास्मोडियम या जंतूचे नर व मादी प्रकार विकसित होण्यासाठी एक नियंत्रक प्रथिन वापरले जाते त्याचाही शोध वैज्ञानिकांना लागला आहे. या विशेष लैंगिकता दर्शक पेशी मलेरियाच्या जंतूंचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरतात.
संशोधनोपयोग वैज्ञानिकांनी या परोपजीवी
जंतूच्या लैंगिकता दर्शक पेशी म्हणजे गेमेटोसायइटसची क्षमता पुन्हा निर्माण करणारे प्रथिन दुरूस्त करण्यात जनुकीय अभियांत्रिकीच्या मदतीने यश मिळवले आहे. नवीन औषधांच्या मदतीने मलेरियाचा प्रसार ज्यामुळे होतो ते खलनायक प्रथिन निकामी करता येईल. मलेरिया हा रोग आफ्रिका, आशिया व अमेरिका यासारख्या देशात तसेच विषुववृत्तीय भागात जास्त आढळतो.
२०.७ कोटी मलेरियाचे
२०१२ मधील एकूण रूग्ण
६. २७ लाख जणांचा मलेरियाने मृत्यू
संदर्भ : जागतिक आरोग्य संघटना
मलेरियाच्या प्रसाराचे कोडे उलगडले
गेले शतकभर मानवाच्या मनात ‘मच्छर’भीती निर्माण करणाऱ्या मलेरियावर रामबाण उतारा निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
First published on: 24-02-2014 at 01:32 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stepping up the fight against drug resistant malaria