जेव्हा तुमच्या पोटात जंत असतात तेव्हा ते शरीराला अन्नातून मिळणाऱ्या पोषक तत्वांचा फायदा घेऊ देत नाहीत. त्यामुळे पोटात समस्या निर्माण होऊ शकते आणि हळूहळू शरीर कमजोर होऊ लागते. सहसा असे स्वच्छतेची काळजी न घेतल्याने आणि काही चुकीचं खाल्ल्याने घडते. विशेषतः लहान मुलांना अशा समस्या जास्त असतात. पोटात जंत असल्याची शंका असल्यास स्वयंपाकघरातील वस्तूंच्या मदतीने त्यापासून सुटका मिळवू शकता.
कलोंजी
कलोंजीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात जे आपल्या पोटासाठी फायदेशीर मानले जातात. १० ग्रॅम कलोंजी पावडर ३ चमचे मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास जंत दूर होतात.
काळी मिरी
काळी मिरी हा तो मसाला आहे, ज्याच्या वापराने अनेक पदार्थाची चव वाढते, एक ग्लास ताकात थोडी काळी मिरी पावडर मिसळून रात्री प्यायल्यास पोटातील जंत मरतात.
मध
मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो, त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ओवा मधात मिसळून दिवसातून तीनदा प्यायल्याने जंत मरतात.
( हे ही वाचा; दर महिन्याला २-३ किलो वजन कमी करण्यासाठी इतका वेळ चालणे गरजेचे; मात्र तज्ज्ञांनी सांगितलेली पद्धत एकदा जाणून घ्या)
मुळा
हिवाळ्यात मुळा खाणे खूप फायदेशीर मानले जाते. या ऋतूत पोटात जंत असल्यास मुळ्याचा रस काढा, त्यात काळी मिरी पावडर आणि काळे मीठ मिसळून दिवसातून दोनदा प्या.
गाजर
गाजर ही अतिशय पौष्टिक फळभाजी म्हणून खाल्ली जाते. पोटातील जंत काढण्यासाठी गाजराचे पेय तयार करून ते ४ ते ५ दिवस प्यावे. यामुळे तुम्हाला चांगला परिणाम मिळेल.
( वरील बातमी माहितीवर आधारित आहे, अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)