बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या गरमा गरम वाफाळलेल्या चहाने करतात. आपण भारतीयांचा दिवस सकाळच्या चहाशिवाय सुरू होत नाही. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पितात.परंतु आपण सर्वजण चहाच्या संदर्भात दररोज चूक करतो. एकदा कपात गाळलेला चहा थंड झाला की पुन्हा गरम केला जातो. चहा वारंवार गरम करून पिण्याची सवय अनेकांना असते. आरोग्यावर तुमच्या सवयीचा वाईट परिणाम होऊ शकतो

लोहाची कमतरता होऊ शकते

Diwali Padwa bali pratipada 2024 Wishes In Marathi hd photo
Diwali Padwa 2024 निमित्त नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा; हटके HD फोटो, Messages, Whatsapp Status पाठवून करा खूश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Benefits of Sunflower Seeds for hair
Sunflower Seeds For Hair : केस खूप गळतात? मग सूर्यफुलाच्या बियांचा करा वापर, सगळ्या समस्या होतील झटक्यात दूर
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

होय, चहा पुन्हा गरम करणे हे तुमच्या लोहाच्या कमतरतेचे कारण असू शकते. आहारतज्ज्ञ सांगतात की, की चहाच्या पानांमध्ये टॅनिन असतात – एक संयुग जे चहाला वेगळा रंग आणि चव देते. मात्र, जेव्हा तुम्ही चहा पुन्हा गरम करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे चहाची चव आणि सुगंध पूर्णपणे नाहीसा होतो. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही चहा पुन्हा गरम करता तेव्हा ते चहाच्या आत असलेले पोषक घटक पूर्णपणे नष्ट होतात.ज्यामुळे लोहाची कमतरता होते

ॲसिडिटी आणि पोटाच्या समस्या

इतकेच नाही तर चहा पुन्हा गरम केल्यानेही ॲसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आहारतज्ज्ञ सांगतात की, “जेव्हा आपण चहाची पाने जास्त शिजवतो तेंव्हा ते आम्लयुक्त बनतात, विशेषतः दुधात मिसळल्यावर.” या ऍसिडिक कंपाऊंडमुळे छातीत जळजळ, ऍसिड रिफ्लक्स आणि पोटात जळजळ होऊ शकते. यामुळे दिवसभर खूप अस्वस्थता देखील होऊ शकते. हे टाळण्यासाठी, दुधाशिवाय चहा बनवण्याचा प्रयत्न करा .

डिहायड्रेशन

तुम्हाला माहित आहे का चहा पुन्हा गरम केल्याने देखील तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो? याचे कारण असे की चहामध्ये कॅफिन असते आणि जेव्हा तुम्ही ते जास्त शिजवता तेव्हा कॅफिनची एकाग्रता वाढते.आहारतज्ज्ञ सांगतात की, कॅफीन देखील एक सौम्य लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे.

हेही वाचा >> जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….

चहा पिण्याचा योग्य मार्ग काय ?

१. जर तुम्हाला चहा बनवून फक्त १५ मिनिटे झाली असतील तर तुम्ही पुन्हा गरम करून पिऊ शकता.

२. जर चहा ठेवून ४ तासांपेक्षा जास्त वेळ झाला असेल तर ते पुन्हा गरम करण्याची चूक अजिबात करू नका.

३. चहा बनवताना, त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या. आवश्यक तेवढाच चहा बनवा. जर आपल्याला सकाळी चहा पिण्याची सवय असेल, तर त्यासोबत काहीतरी हलके पदार्थ नक्कीच खा. फक्त चहा पिऊ नका

Story img Loader