हिवाळ्यातील धुरक्यामुळे राजधानी दिल्लीबरोबरच देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही हवा दुषित झाली आहे. अगदी सकाळी दहा वाजेपर्यंत धुरके असते. अशा वातावरणामुळे शरीराला हानिकारक असे घटक श्वासाद्वारे शरीरात जातात. फक्त मास्क लावून या प्रदूषित हवेपासून बचाव करणे शक्य नाही. योगासनांच्या मदतीने आणि श्वसनाच्या वेगवेगळ्या पद्धतीने श्वसन संस्थेवर पडणारा ताण कमी करता येऊ शकतो. जाणून घेऊयात अशीच काही खास योगासने जी तुमच्या श्वसनाची क्षमता वाढवू शकतात.
प्राणायाम
ब्राँकायटिस किंवा फुफ्फुसांचा संसर्ग असलेल्यांना फायदेशीर. प्राणायाम केल्याने श्वासावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते.
अधोमुख शवासन
फुफ्फुसांसाठी हे उपयुक्त असे आसन आहे. ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळण्यासाठीही या आसनाचा फायदा होतो
भुजंगासन
हृदय आणि फुप्फुसे हे योगासन फायद्याचे असते. हे आसन करताना या स्नायूंवर ताण पडतो त्यामुळे तसेच रक्ताभिसरण वाढते.
सुखासन
आसनस्थ अवस्थेमध्ये ताठ बसून श्वास घेण्याच्या या आसनामुळे मानसिक शांतता मिळते. तणाव, चिंता आणि थकव्यापासून कमी करण्यास हे आसन फायद्याचे आहे.
मार्जारी आसन
मार्जारी आसन म्हणजे मांजरीप्रमाणे शरीर ताणणे. या आसनात दीर्घ श्वसन करायचे असते. फुप्फुसे निरोगी राहण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.
आरोग्य विषयक सल्ला घेऊन ही आसने तुम्ही जरुर करू शकता.