आपण नेहमीच ऐकत आणि वाचत आलो आहोत की तणाव आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगला नाही. इतकंच नाही तर ताणतणाव आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवतो. पण एका नवीन संशोधनाने पुष्टी केली आहे की मेंदूची काम करण्याची क्षमता सुधारण्यात तणाव महत्त्वाची भूमिका बजावतो. न्यूरो सायन्स न्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, जॉर्जिया विद्यापीठाच्या युवा विकास संस्थेच्या संशोधकांना असे आढळून आले आहे की कमी ते मध्यम पातळीचा ताण मानसिक आजारांचा धोका कमी करण्यात मदत करतो.
संशोधनानुसार, जरी तुमचे डोके जड वाटत असेल किंवा तणावामुळे तुम्हाला थकवा जाणवत असेल, परंतु लहान मुदतीचा ताण तुमच्या मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरतो. मात्र, अतिरिक्त ताण मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो, असेही आढळून आले आहे. नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की कमी किंवा किंचित जास्त तणावामुळे मानसिक लवचिकता वाढते आणि मानसिक विकार होण्याची शक्यता कमी होते. उदासीनता आणि समाजविरोधी वर्तन यांसारख्या समस्या कमी करण्यातही हे मदत करू शकते. हे कौशल्य विकास आणि वैयक्तिक विकासामध्ये प्रभावी सुधारणा आणते.
Photos : थंड पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि कॉलेज ऑफ फॅमिली अँड कन्झ्युमर सायन्सेसमधील सहयोगी प्राध्यापक असफ ओश्री म्हणतात की, जेव्हा तुम्ही अशा वातावरणात असता, जिथे तुम्हाला दररोज कोणत्या ना कोणत्या पातळीवर तणावाचा सामना करावा लागतो. तेव्हा हा ताण तुमच्या मनाचा विकास करण्यास मदत करतो आणि तुम्हाला एक कार्यक्षम आणि प्रभावी कर्मचारी बनण्यास मदत करतो. इतकंच नाही तर यामुळे तुमची कामगिरी सुधारण्यातही खूप मदत होते.
जेव्हा तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करता तेव्हा हलका तणाव तुमच्यासाठी फायदेशीर असतो. हा ताण तुमची कार्यक्षमता वाढवण्यास खूप मदत करतो. त्याचप्रमाणे, ऑफिसमधील एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी कराव्या लागणाऱ्या तयारीच्या वेळी येणारा ताण आणि पूर्वतयारी यामुळे तुमची वैयक्तिक वाढ पूर्वीपेक्षा अधिक होण्यास मदत होऊ शकते.
बाळाला घेऊन सुरक्षित प्रवास कसा करायचा? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
याशिवाय जेव्हा लेखकाचे लेखन प्रकाशकाकडून नाकारले जाते, तेव्हा लेखकाला निश्चितच तणावाचा सामना करावा लागतो, परंतु हा ताण त्याला अधिक मेहनत करण्यास मदत करतो आणि त्याचा परिणाम त्याच्या पुढील लिखाणात दिसून येतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)