जीवनात मानसिक तणाव बाळगणाऱया पालकांसाठी धोक्याची घंटा वाजविणारी गोष्ट एका अभ्यासातून समोर आली आहे. वेगवेगळ्या कारणांनी मानसिक तणाव बाळगणाऱया पालकांना होणारी मुले अतिलठ्ठ होऊ शकतात. असे टोरान्टोमधील सेंट मायकल रुग्णालयाने केलेल्या अभ्यातून समोर आले आहे.
इतर म्हणजेच प्रमाणाने कमी मानसिक तणाव बाळगणाऱया पालकांच्या मुलांपेक्षा तणावग्रस्त पालकांच्या मुलांमध्ये ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) दोन टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर तणावग्रस्त पालकांच्या मुलांमधील वजन वाढीमध्ये इतर मुलांपेक्षा सात टक्क्यांचा फरक आढळून येतो.
टोरान्टोमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तणावग्रस्त पालकांच्या मुलांमधील वजनवाढीतील टक्केवारी जरी सात टक्क्यांनी जास्त असली म्हणजेच त्यांचे वजन जास्त असणे त्यांना भूक लागणे हे चांगले असले तरी, हे यात सतत वाढ होत राहिल्याने भविष्यात त्यांना गंभीर लठ्ठपणा आणि आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तेथील डॉक्टरांनी दरवर्षी पालकांना एका प्रश्नावलीतून मानसिक तणावाचे प्रमाण ओळखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांच्या मुलांच्या बीएमआय चाचण्याही घेण्यात आल्या त्यातून ही माहिती समोर आली आहे.
पालकांच्या मानसिक तणावाचे प्रमाण आणि त्याचा मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणा जाणून घेणारा असा अभ्यास प्रथमच करण्यात आला. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पालकांनी मानसिक तणाव घेणे शक्यतो टाळत रहावे. अशावेळी आपल्या स्वभावात किंचित बदल करून पहावा असा सल्ला दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2013 रोजी प्रकाशित
‘तणाव’ग्रस्त पालकांनो सावधान!; मुले अतिलठ्ठ होऊ शकतात
जीवनात मानसिक तणाव बाळगणाऱया पालकांसाठी धोक्याची घंटा वाजविणारी गोष्ट एका अभ्यासातून समोर आली आहे. वेगवेगळ्या कारणांनी मानसिक तणाव बाळगणाऱया पालकांना होणारी मुले अतिलठ्ठ होऊ शकतात.

First published on: 09-12-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stressed parents may have obese kids