Stretch Marks: अलीकडेच तुम्ही वजन कमी केलंय का? किंवा तुमच्या घरात कुण्या नव्या पाहुण्याचं आगमन झालंय का? मुख्यतः हे दोन आनंदी क्षण अनुभवताना तुमच्या शरीरातील काही बदल तुम्हाला नकोसे वाटू शकतात. जसे की स्ट्रेच मार्क!

गर्भारपणात किंवा वजन वाढलेले असताना त्वचा ताणली जाते व स्ट्रेच मार्क पडतात. तुमचे वजन पुन्हा पूर्वीसारखे झाले की हे स्ट्रेच मार्क अधिक ठळक दिसू लागतात. हे स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, काही पर्याय खिशाला परवडणारे नसतात. यासाठी तुम्ही घरगुती उपाय वापरून नैसर्गिकरित्या हे स्ट्रेच मार्क्स कमी करू शकता.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
वाढवण-इगतपुरी द्रुतगती महामार्गाचे संरेखन निश्चित
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा? (फोटो सौजन्य @Freepik)
Heart Attack Exercise : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा?
A 6-6-6 walking regimen will improve your health Experts
६-६-६ चालण्याचा नियम तुमच्या आरोग्य सुधारेल; तज्ज्ञांनीही सांगितले जबरदस्त फायदे…

हेही वाचा… Kitchen Jugaad: कढईत एकदा व्हिनेगर टाकून पाहाच; या उपायाने होईल मोठा फायदा

सौम्य पण प्रभावी घरगुती उपाय

कोरफड : कोरफड ही त्याच्या उपचार गुणधर्मांसाठी ओळखली जाते. नियमित वापराने, ती त्वचेचे पोषण करण्यास मदत करते आणि स्ट्रेच मार्क्स हलके करू शकते. फक्त काही ताजे कोरफड घ्या, त्यातील जेल काढा आणि दररोज तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर मसाज करा.

शुगर स्क्रब : DIY शुगर स्क्रब त्वचा एक्सफोलिएट करण्यात आणि सेल टर्नओव्हरला प्रोत्साहन देण्यासाठी आश्चर्यकारक काम करू शकते. बदामाच्या तेलाच्या किंवा लिंबाच्या रसाच्या काही थेंबांमध्ये साखर मिसळा आणि आपल्या स्ट्रेच मार्क्सवर हलक्या हाताने घासून घ्या. हे आठवड्यातून दोन-तीन वेळा करा.

व्हिटॅमिन इ कॅप्सूल : ही छोटी कॅप्सूल पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. एक कॅप्सूल उघडा आणि तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर याने मालिश करा. व्हिटॅमिन इ त्वचेचे पुनरुत्पादन आणि हायड्रेशनला प्रोत्साहन देते, ज्यामुळे त्या रेषा फिकट होण्यास मदत होते.

कोको बटर : कोको बटर हे एक मॉइश्चरायझर आहे. हे त्वचा मुलायम ठेवतं, ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स हलके दिसू शकतात. कोको बटरने दररोज मसाज केल्याने केवळ तुमच्या स्ट्रेच मार्क्सह तुमची त्वचादेखील मऊ होईल.

एरंडेल तेल : एरंडेल तेल हे त्याच्या जाड आणि रिच टेक्चरसाठी ओळखले जाते. हे तेल त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठी योग्य आहे. झोपण्यापूर्वी थोडेसे तेल कोमट करून तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर याचा मसाज करा. सुमारे ३० मिनिटे स्वच्छ कापडाने स्ट्रेच मार्क असलेला भाग झाकून ठेवा आणि तेलाची जादू पाहाच.

जर घरगुती उपायांबरोबरच तुम्हाला अ‍ॅडव्हॉन्स पर्याय ट्राय करायचा असेल तर क्लिनिकल पद्धतींच्या मदतीनेदेखील स्ट्रेच मार्क कमी होऊ शकतात.

स्ट्रेच मार्क्स फेडिंगसाठी अ‍ॅडव्हॉन्स उपाय

जर तुम्ही नैसर्गिक पद्धतींच्या पलीकडेही उपाय ट्राय करण्यास तयार असाल, तर आधुनिक औषध स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी काही प्रभावी उपचार देतात.

रेटिनॉइड क्रीम्स : रेटिनॉइड्स हे व्हिटॅमिन ए पासून घेतले जातात. तसेच रेटिनॉइड्स त्वचेला रिज्यूवनेट करणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखले जातात. प्रिस्क्रिप्शन रेटिनॉइड क्रीम्स कोलेजन उत्पादनास उत्तेजन देतात, जे स्ट्रेच मार्क्स स्मूद आणि फिकट होण्यास मदत करतात. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा स्तनपान करत असाल तर रेटिनॉइड्स टाळण्याचे लक्षात ठेवा.

मायक्रोडर्माब्रेशन : जर तुम्हाला एक्सफोलिएशन आवडत असेल, तर मायक्रोडर्माब्रेशन हे एक प्रोफेशनल एक्सफोलिएटर आहे. या उपचारामुळे तुमच्या त्वचेचा बाह्य थर हळूवारपणे निघून जातो आणि स्ट्रेच मार्क्स कमी दिसतात. या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला काही सेशन्सची आवश्यकता असू शकते, परंतु परिणाम प्रभावी असू शकतात.

लेझर थेरपी : ही अ‍ॅडव्हॉन्स पद्धत कोलेजन उत्पादनास उत्तेजित करते आणि गडद, नवीन स्ट्रेच मार्क्स हलके करू शकते. यासाठीदेखील सेशन्सची आवश्यकता असते, परंतु लेझर ट्रीटमेटमुळे मोठा फरक जाणवू शकतो.

मायक्रोनेडलिंग : मायक्रोनेडलिंग हे स्किनकेअरच्या जगात आवडती ट्रीटमेंट आहे. लहान सुया वापरून, ते कोलेजनचे उत्पादन उत्तेजित करण्यासाठी त्वचेमध्ये लहान-जखम तयार करतात, ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स बरे आणि फिकट होण्यास मदत होते. तुम्हाला काही सेशन्सची आवश्यकता असू शकते, परंतु परिणाम प्रभावी असू शकतात.

केमिकल पील : प्रोफेशनल दर्जाची केमिकल पील त्वचेला खोलवर एक्सफोलिएट करून स्ट्रेच मार्क्स कमी करण्यास मदत करू शकते. हे पील त्वचेचा वरचा थर काढून टाकते आणि नवीन, नितळ त्वचेच्या वाढीस प्रोत्साहन देते. अधिक हट्टी असलेल्या स्ट्रेच मार्क्ससाठी हा एक लोकप्रिय पर्याय आहे.

Story img Loader