बदलत्या जीवनशैलीत प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसू इच्छितो. सुंदरता हा व्यक्तीचा सुंदर दागिना आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची उर्मी माणसात असते. सुंदर दिसण्यासाठी तो कितीही किंमत मोजू शकतो. अलिकडे, ब्युटी पार्लरचा ट्रेंड आहे. पार्लरमध्ये जाऊन पाहिजे तसा आकर्षक चेहरा बनविता येऊ शकतो. पार्लरला जाऊन हेअर वॉश करतांना जे तंत्र वापरले जातात, त्यामुळं आपल्याला ‘ट्रोक सिंड्रोम’ येऊन आपला मृत्यू देखील होऊ शकतो. होय, हे खरं आहे. नुकतंच हैदराबादमध्ये अशी धक्कादायक घटना पुढं आली आहे.
हैदराबाद ब्युटी पार्लरचं प्रकरण काय आहे ?
नुकतंच हैद्राबादचे न्यूरोलॉजिस्ट डॉ.सुधीर कुमार यांनी या सिंड्रोमविषयी माहिती दिली. ५० वर्षांची महिला ब्युटी पार्लरमध्ये हेअर कट करायला गेली. हेअरकट करण्यापूर्वी तिने हेअरवॉश करून घेतला, पण त्याचवेळी तिला स्ट्रोक आला. चक्कर येणं, उलटी अशी स्ट्रोकची सामान्य लक्षणं आहेत. पार्लरला गेलेल्या या महिलेमध्ये अशी लक्षणं दिसली. आपल्याला गॅसची समस्या असावी, म्हणून ही महिला गॅस्ट्रो तज्ज्ञांकडे गेली. पण तिला गॅसची समस्या नसल्याचं निदान झालं. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, केस धुण्यासाठी जेव्हा तिने आपली मान वाकवली तेव्हा तिच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा करणारी नस दबली गेली आणि त्यामुळे तिला स्ट्रोक आला.
आणखी वाचा : ‘या’ घरगुती उपायांनी मुरूम आणि डागांपासून मिळवा सुटका; त्वचा होईल तजेलदार
स्ट्रोक सिंड्रोम म्हणजे काय ?
ब्युटी पार्लरमध्ये रिलॅक्सिंग मोडमध्ये असणाऱ्या चेअरवर बसविल्या जातं. त्यावर मागे मान करून मानेवर येणारा ताण आपल्यासमोर गंभीर समस्या निर्माण करू शकतो. याला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हटलं जातं. किंवा ब्रेनवर त्याचा विपरित परिणाम देखील होतो. त्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतात. मानेवर ताण आल्याने मेंदूकडे ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. त्यामुळे मेंदूच्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या अवयवांना ऑक्सिजन पुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांना डॅमेज होतो. मान मागे गेल्याने बारीक व्हेन्स ज्या ऑक्सिजन वाहून नेतात त्या दाबल्या गेल्याने ऑक्सिजन पुरवठा होत नाही. डॉक्टरांच्या मते, सलूनमध्ये मानेचा मसाज करणाऱ्या पुरुषांमध्ये अशी समस्या बरीच पाहायला मिळते.