Eating An Egg A Day अंडी खाणे बहुतेक लोकांचा हा आवडता नाश्ता असतो. आरोग्य तज्ज्ञ न्याहारीमध्ये अंडी खाण्याचा सल्ला देतात.तसेच फिटनेस फ्रेकदेखील प्रोटिन्स मिळविण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करतात. एकूणच अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे स्नायूंच्या विकासापासून शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरते. पण तुम्हाला माहितीये का? दररोज अंडी खाल्ल्याने महिलांसाठी विशेष फायदा आहे. दररोज एक अंडे खाल्ल्याने महिलांची स्मरणशक्ती सुधारते असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. अंड्यांमध्ये आहारातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असले तरी ते संज्ञानात्मक कार्यासाठी फायदेशीर पोषक तत्त्वे देखील देतात.
अंड्यांमध्ये B-6, B-12 आणि फॉलिक ऍसिड सारखी जीवनसत्त्वे देखील असतात, ज्यामुळे मेंदूचे कार्य चांगले होते. हे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत. पुरुषांच्या तुलनेत रोज अंडी खाल्ल्यानं महिलांना त्याचा जास्त फायदा होतो. वाढत्या वयानुसार मेंदूतील बदल आणि स्मरणशक्ती कमी होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे, ज्याला लोक गांभीर्याने घेतात. तर महिलांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचं प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे अंडी खाणे फायदेशीर ठरू शकते.
अंडी खाण्याचे फायदे
संशोधकांनी असेही सांगितले की, अंडी केवळ मेंदूसाठीच फायदेशीर नसतात, तर महिलांच्या हाडांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरू शकतात.
अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खावा.
अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे प्रथिने मिळतात.
अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न टाळले जाते.
कोणताही उपाय वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
हेही वाचा >> मसालेदार अन्न खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या; अन्यथा होतील गंभीर परिणाम
एका दिवसात किती अंडी खाणे योग्य आहे?
तज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तीने दररोज दोन ते तीन अंडी खाणे आवश्यक आहे. निरोगी लोक आठवड्यातून ७ ते १० अंडी खाऊ शकतात. जे खेळाडू आहेत किंवा जे जीम, वर्कआउट करतात, त्यांना जास्त प्रोटीनची गरज असते त्यामुळे ते दिवसातून चार ते पाच अंडी खाऊ शकतात. जे लोक रोज अंडी खातात त्यांनी अंड्याचा पांढरा भागच खावा. याशिवाय जर कोणाला हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी दिवसात दोनपेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी अंड्याचे सेवन कमी करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.