डोळे हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक. डोळ्यांवरून आपण कसे आहोत याची परीक्षा होत असते. म्हणूनच डोळ्यांचा मेकअप काळजीपूर्वक केला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेकअप करणे हा सगळ्या स्त्रियांचा आवडीचा विषय. मेकअप करताना प्रत्येक घटक खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक गोष्ट प्रमाणातच वापरली जाणे तेवढेच महत्त्वाचे असते. तसेच आयमेकप हा त्यातील अविभाज्य भाग आहे. कोणत्याही समारंभासाठी किंवा पार्टीसाठी जाताना इतर मेकअप नसेल तरीही चालतो, परंतु आय मेकअप असेल तरीही तुम्ही उठावदार दिसू शकता. डोळे जेवढे उठावदार असतात,तेवढे तुम्ही उठावदार दिसता. त्यामुळे आय मेकअप करणे महत्त्वाचे आहे. बघू या.

आय मेकअप नूड किंवा नॅचरल आय मेकअप

नूड किंवा नॅचरल आय मेकअप करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करू नये. हा लुक करण्यासाठी काजळ पेन्सिल हलक्या हातांनी आपल्या डोळ्यांच्या खालच्या व वरच्या वॉटर लाइनवरून फिरवावी. त्यांनी डोळ्याचा आकार उठून दिसेल. त्यांनतर पापण्यांना मस्कारा लावावा. डोळ्याच्या खालच्या पापण्यांनाही मस्कारा लावून घ्यावा. आयलाइनरचा बारीक लाइन लावून लुक पूर्ण करावा. कॉलेजला जाताना, फॉर्मल मिटिंग्सना जाताना, इन्फॉर्मल मीटअप्ससाठी तसेच डे आऊट्सला जाताना हा आयमेकअप तुम्ही करू शकता.

स्मोकी आइज मेकअप

हा लुक करताना डोळ्यांना सर्वप्रथम प्राइमर लावून घ्यावे. त्यांनतर बीबी किंवा सीसी क्रीम लावून डोळ्यांना बेस लावून घ्यावा. त्यांनतर ब्लॅक आय शॅडो डोळ्यांना लावून घ्यावं. ते करताना हळूहळू कोपऱ्यातून आयशॅडो लावायला सुरुवात करावी आणि त्यांनतर हळू पुढे पुढे आयशॅडो लावावं. दोन्ही डोळे ब्लॅक आयशॅडोने कव्हर करून झाले की डोळ्यांचा आकार डिफाईन दिसण्यासाठी आय बोन्स ना सिल्व्हर किंवा व्हाइट आय शॅडो लावावं. आयलायनर लावून लुक पूर्ण करावा. पार्टीला जाताना किंवा रात्रीच्या वेळी बाहेर जाताना, एखाद्या कॅज्युअल डे ड्रेसवर तुम्ही हा आयमेकअप करू शकता.

स्मोकी आइजची सोप्पी पद्धत

घाई गडबड असेल आणि आपल्या आऊटफिटवर स्मोकी आइज लुक करायचा असेल तर आपल्या काजळ पेन्सिलने डोळ्याला डार्क काजळ लावून घ्यावं आणि त्यांनतर हाताने हळूहळू स्मज करावं. तसेच आयलायनर लावून ते डोळ्यांवर स्मज करावं. हायलाइट करण्यासाठी डोळ्यांच्या खोलगट भागात ब्लॅक आयशॅडोने हायलाइट करून घ्यावं.

डे आय लुक

हा लुक करताना प्रायमर डोळ्याला लावून घ्यावं. त्यांनतर तुमच्या आऊटफिटला सूट होणाऱ्या पेस्टल शेड्समधील आयशॅडो डोळ्यांना व्यवस्थित लावून घ्याव्या. त्यांनतर आयलाइन लावून लुक पूर्ण करावा. आयलाइनर लावताना ट्विग्स डोळ्याबाहेर काढले तरीही खूपच मस्त लुक मिळतो. त्याच्या बरोबरीने काजळ लावावं आणि लुक पूर्ण करावा. पेस्टल शेड्समध्ये गुलाबी, निळा, पिवळा आणि हिरवा या शेड्स वापराव्या त्यांनी खूप फ्रेश लुक चेहऱ्याला मिळेल. डे आउट्स, ऑफिस मिटिंग्ज, इव्हििनग पार्टीज इत्यादीसाठी हा परफेक्ट लुक ठरेल.

पार्टी आय लुक

पार्टी आय लुक हा थोडासा भडक पण तरीही क्लासी असा लुक आहे. हा लुक पार्टी किंवा समारंभांसाठीच तुम्ही वापरू शकता. नाइट पार्टीला जाताना आय मेकअप करायचा असेल त्यावेळी ग्लिटर्स, शिमर्स आयशॅडोज् आवर्जून वापरा. बेस पेस्टल कलर ठेऊन त्याला शोभून दिसणारी गोल्डन किंवा सिल्वर ग्लिटर आय शॅडो लावा. तसेच स्मोकी आइज लुक करून त्यावर गोल्डन किंवा सिल्व्हर शॅडोज् खूपच छान दिसतील. यावेळी तुम्ही लेन्सेस वापरू शकता, तसेच लुक पूर्ण करण्यासाठी खोटय़ा आय लॅशेज वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला खूपच बोल्ड लुक मिळेल. या लुकमध्ये चेहऱ्यालासुद्धा बेस मेकअप करणे आणि लिपस्टिक वापरणे गरजेचे आहे.

डबल शॅडो लुक

पार्टी आय लुकमध्ये दुसरी पद्धत म्हणजे डबल श्ॉडो लुक. त्यासाठी पहिल्यांदा बेस पेस्टल शॅडो लावून घ्यावं. आणि त्याला दुसऱ्या कलरच्या कॉन्ट्रास्ट शॅडोने शेडिंग करावं. तुमच्या आऊटफिटमध्ये असलेल्या दोन कलर्सचा वापर करून तुम्ही हा लुक तयार करू शकता. ब्लू-िपक, येल्लो-िपक, ग्रीन-ब्लू ही काही त्यातली कॉम्बिनेशन्स आहेत. आयलायनर आणि काजळ प्रमाणात लावून हा लुक पूर्ण करावा.

आयलायनर लावण्याच्या पद्धती

बेसिक लुक

बेसिक लुकमध्ये आयलायनरची पातळ लाइन डोळ्यांवर लावली जाते. डोळ्यांच्या आकारानुसार ही लाइन अलगदरीत्या डोळ्यांवर लावून हा लुक पूर्ण होतो. रेग्युलर आयलायनर लावणाऱ्यांसाठी हा परफेक्ट लुक आहे.

विग आयलायनर

या लुकमध्ये बेसिक आयलायनर लावून झाले कीएक स्ट्रोक डोळ्याबाहेर काढला जातो. बेसिक आय लायनर इतक्याच पातळ लाइनने हा स्ट्रोक डोळ्याबाहेर काढावा. जास्त मोठा किंवा लहान स्ट्रोक काढू नये चेहऱ्याच्या प्रमाणातच हा स्ट्रोक असावा.

कॅट्स आय

या लुकमध्ये पाकळीच्या आकाराप्रमाणे आयलायनर लावावे. कोपऱ्यातून पातळ लाइन काढत काढत शेवटाला जाड लाइन काढावी. त्यांनतर िवग बाहेर काढावा. हा विंग, आयलायनरपेक्षा जाड असू द्यावा. लावताना सर्वप्रथम आऊटलाइन काढून घ्यावी आणि नंतर आतील भाग लायनरने भरावा. पार्टीज किंवा समारंभांसाठी अशा पद्धतीचे आयलायनर खूपच छान दिसेल.

पपी डॉग आयलायनर लुक

पपी डॉग आयलायनर लूक करताना, आपल्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ बेसिक आयलायनर लावून घ्यावे. त्यांनतर आयबॉलपासून सुरू करून डोळ्याच्या बाहेरील कोपऱ्यापर्यंत असे अध्र्यातून काजळ लावून घ्यावे. डोळ्याच्या कडांना नेहमीपेक्षा गडद काजळ लावावे. डोळ्याच्या कोपऱ्यातील काजळ आणि आयलायनरलची टोकं एकमेकांना जुळतील अशा पद्धतीने लावावे.

या काही बेसिक आणि नेहमी वापरता येतील अशा आयलायनर स्टाइल्स आहेत.

काही महत्त्वाच्या टिप्स

’ आय मेकअप करताना आपल्याबरोबर नेहमीच एक स्वच्छ कापड किंवा कापूस बरोबर ठेवावा.

’ काही वेळेस आपण लावलेले आयलायनर किंवा काजळ आपल्याला आवडत नाही, किंवा कधी कधी ते लावता लावता फिस्कटलं जात अशा वेळी पाण्याचा वापर न करता जवळ असलेल्या कोरडय़ा फडक्याने हळूहळू ते पुसून घ्यावं.

’ काही वेळा गालाला किंवा कपाळाला काळे डाग चुकून लागले जातात अशा वेळी कोरडय़ा कापडाने पुसून घेऊन कन्सीलरचा वापर करून डाग लपवावे.

’ डोळा हा आपल्या चेहऱ्याचा नाजूक भाग आहे, त्यामुळे आपण वापरत असलेले प्रॉडक्टस विश्वासार्ह असतील याची काळजी घ्या.

’ एखादे वेळेस शिमर शॅडो आपल्या चेहऱ्याला आजूबाजूला लागते अशा वेळी तेवढय़ाच भागाला प्राइमर किंवा क्लिंझिंग मिल्क लावून कापसाने किंवा कापडाने पुसून घ्यावं.

’ आयलायनर आणि काजळ एकत्र लावताना डोळा अतिभडक होणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी.

’ हात थरथरत असेल तर आयलायनर लावण्याऐवजी काजळ पेन्सिल वापरावी आणि ती लावताना डोळ्यांची पापणी ताणून धारावी.

’ काही वेळा लाकडी काजळ पेन्सिल आपण वापरतो, त्यावेळी ती व्यवस्थित टोक काढून त्याचे टोक बोथट करून मगच वापरावी. त्याचे तूस डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.

’ लगेचच परफेक्ट आयलायनर लावणे शक्य नसते, सवय झाली की तुम्ही परफेक्ट आयलायनर आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टाइल्स करू शकता.

’ आय मेकअप पुसताना क्लििझग मिल्क किंवा तेलाचा वापर करावा. कापड किंवा कापूस वापरून अलगद हाताने आयमेकअप काढावा. डोळा घासू नये. आय मेकअप काढल्यावर रोज वॉटरने कापूस ओला करून काही वेळ डोळ्यांवर ठेवावा.

सो गर्ल्स गेट रेडी फॉर आय मेकअप अ‍ॅण्ड मे द िवग्स ऑफ युअर लायनर ऑलवेज बी इव्हन.

सौजन्य – लोकप्रभा

response.lokprabha@expressindia.com