हळूहळू वाढत जाणारे कर्णबधिरत्व दूर करण्यासाठी जनुकीय संपादन तंत्राचा उपयोग होत असल्याचे उंदरावरील प्रयोगात दिसून आले असून त्यात कर्णबधिरत्व टाळता येते. माणसातही कर्णबधिरत्व ज्या जनुकांमुळे येते त्याचे संपादन केल्यास हा आजार बरा करता येणे शक्य होणार आहे. अमेरिकेतील हॉर्वर्ड ह्य़ूजेस मेडिकल इन्स्टिटय़ूटचे डेव्हिड लिऊ यांनी सांगितले की, जनुकीय संपादनाचा वापर प्राण्यांमधील कर्णबधिरत्व दूर करण्यासाठी प्रथमच केला गेला आहे. जनुक संपादनाच्या मिश्र घटकांचे इंजेक्शन दिल्यानंतर तरुण प्राण्यांमध्ये कर्णबधिरत्व दूर होते. याबाबतचा प्रयोग उंदरांमध्ये यशस्वी झाला असून तो माणसात यशस्वी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लिऊ यांनी सांगितले की, या तंत्राने एक दिवस माणसातले कर्णबधिरत्व दूर करता येईल यात शंका नाही. कर्णबधिरत्वाच्या निम्म्या रुग्णांमध्ये जनुकीय कारणे असतात. त्यात इतर उपचारांना मर्यादा आहेत. जनुकीय उत्परिवर्तनाने कर्णबधिरत्व येत असते ते दूर करणे अवघड असते. कर्णबधिरत्वाशी टीएमसी १ हा जनुक संबंधित असतो. त्यातील एका चुकीमुळे आंतरकर्णातील बारीक केसांच्या पेशी कमी होतात व त्यामुळे ऐकू कमी येते.

टीएमसी १ जनुकामुळे बहिरेपणा येत जातो. उंदरातील बिथोव्हेन या जनुकाची उत्परिवर्तित आवृत्ती काढून टाकली तर श्रवणक्षमता सुधारते. आंतरकर्णातील बारीक केस एकदा खराब झाले की  पूर्ववत करता येत नाहीत पण जनुकीय संपादनाने ते शक्य होते त्यामुळे श्रवण पूर्ववत करता येते.