रोगमुक्त जीवन जगण्यासाठी निरोगी यकृत अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक यकृत होय. शरीरातील चरबी पचवणारे प्रथिने आणि पित्त निर्माण करण्याचं काम यकृत करतं. तसंच हे प्रथिने रोगाशी लढणारे अँटिऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे साठवतात आणि महत्वाचं म्हणजे आपलं शरीर स्वच्छ करतं. तसंच शरीरातील विषारी आणि इतर हानिकारक पदार्थ काढून टाकण्याचं काम करतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरीरात होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे देखील फॅटी लिव्हर होऊ शकतो. उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, रक्तातील साखरेची उच्च पातळी, ट्रायग्लिसराईड्सची उच्च पातळी, मेटाबॉलिक सिंड्रोम, पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम आणि स्लीप एपनिया सारखे आजार नॉन -अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्यास कारणीभूत ठरतात.

आहारतज्ज्ञ पूजा मखीजा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नॉन -अल्कोहोलिक फॅटी लिव्हर या आजाराबद्दल काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक चार व्यक्तीमागे एकजण या आजाराने ग्रस्त असल्याचं दिसून येतं. हा आजार जास्त अल्कोहोल पिण्यामुळे नाही तर अतिरिक्त कॅलरीजमुळे सुद्धा होतो, असं त्यांनी सांगितलं आहे.

यकृताच्या समस्या जाणवू लागल्यानंतर लवकर त्यावर निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हे न तपासल्यास सिरोसिससारख्या गंभीर आणि गुंतागुंतीचा त्रास उद्भवू शकतो. आहारतज्ज्ञ पूजा माखिजा म्हणता की, असं कोणतंही औषध नाही जे नॉन -अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसारखा आजार दूर करण्यास मदत करू शकतं. परंतु वजन संतुलित ठेवणं, योग्य पोषण आणि नियमित व्यायाम केल्यामुळे हा यकृताच्या आजारापासून आपण बचाव करू शकतो.

आहारतज्ज्ञ पूजा मखीजा यांनी पोषक तत्वांवर सुद्धा पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी NAFLD (नॉन -अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग) बरा करण्यासाठीचे टिप्स शेअर केले आहेत.

द्राक्ष

नॉन -अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग बरा करण्यासाठी द्राक्ष उपयुक्त असतात. यात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स नारिंगेनिन आणि नारिंगिन असतात. यामुळे शरीरातील दीर्घकालीन दाहांशी लढा देण्यास मदत होते.

मिल्क थिसल

यकृत रोगाविरुद्ध मिल्क थिसल हे एक “गुप्त शस्त्र” आहे जे अँटिऑक्सिडेंट, दाहक-विरोधी, दाग-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आहे. याला सिलीमारिन म्हणून ओळखलं जातं. हे शक्तिशाली फ्लेव्होनॉइड यकृताच्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते आणि त्यांच्या पुनरुत्पादनात मदत देखील करू शकते.

एन-एसिटाइल सिस्टीन (एनएसी)

एन-एसिटाइल सिस्टीन (एनएसी) आणि अमीनो अॅसिड हे यकृताच्या सर्व महत्वाच्या ग्लूटाथिओनचा पुरवठा पुन्हा भरून काढतो. हे औषध पर्यावरणीय विषारी पदार्थांना बाहेर फेकण्यात महत्वाची भूमिका बजावते. यासाठी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा दररोज ६०० ते १,८०० NAC च्या डोसचा सल्ला देतात. फॅटी लिव्हर रोगासाठी एनएसी वापरण्यापूर्वी ती तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला घेणं गरजेचं आहे.

हे पदार्थ टाळा

अल्कोहोल, रिफाइंड शुगर, प्रोइन्फ्लेमेटरी ट्रान्स फॅट्स, बाहेरील पदार्थ आणि फास्ट (“जंक”) फुड टाळणं देखील महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suffering from fatty liver disease follow these nutrition tips for managing it prp