Period Rashes Tips: मासिक पाळी हा कोणत्याही महिलेसाठी जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक महिलेला निदान ३०-३५ वर्षं दर महिन्याला पाळी येते आणि त्यासोबत येणारे त्रासही सहन करावे लागतात. मासिक पाळीच्या स्वच्छतेमध्ये चांगल्या दर्जाची पीरियड प्रोडक्ट वापरण्यासोबतच तुमच्या योनीमार्गाच्या त्वचेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. पीरियड्स नंतर येणाऱ्या रॅशेसपासून सुटका हवी असेल तर जाणून घ्या सविस्तर…

काय आहे पॅड रॅशचे कारण?

सॅनिटरी पॅड घातल्याने हालचाली दरम्यान घर्षण झाल्यामुळे पुरळ येऊ शकते. सेंटर फॉर यंग वुमेन्स हेल्थच्या मते, चालणे, धावणे आणि शारीरिक हालचालींमुळे पुरळ उठू शकते. तसेच, या दिवसात ओलावा यामुळे देखील पुरळ किंवा रॅशेस होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे सॅनिटरी पॅडचा वापर. या पॅडमधील केमिकल तुमच्या योनीमार्गात आणि मांडीच्या आतील भागात तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकतात.

ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

१. नारळाचे तेल उपयुक्त

त्वचेच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. कारण त्यात त्वचेची चांगली काळजी घेणारे अनेक पोषक घटक असतात. रॅशेस पळविण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. रात्री झोपण्यापूर्वी प्रभावित भाग थंड पाण्याने स्वच्छ करा आणि कॉटन बॉलने प्रभावित भागावर खोबरेल तेल लावा. रात्रभर राहू द्या. सकाळी त्याला स्वच्छ करा.

२. टॅल्कम पावडर वापरा

टॅल्कम पावडर लावल्याने पुरळ येण्याची शक्यता कमी असते. ते अतिरिक्त ओलावा शोषून घेते आणि क्षेत्र कोरडे ठेवते. अशा प्रकारे पुरळ येण्याची शक्यता कमी केली जाऊ शकते.

३. चांगल्या ब्रँडचे पॅड वापरा

पीरियड रॅश होण्यामागे सॅनिटरी नॅपकिन्स हे मुख्य कारण असू शकते. म्हणून, पूर्णपणे कापसाचे बनलेले ब्रँडचे पॅड वापरा. जर तुम्ही ते आधीच वापरत असाल आणि तुम्हाला पुरळ उठण्याची काळजी वाटत असेल, तर सॅनिटरी नॅपकिन्सऐवजी तुम्ही टॅम्पन्स किंवा पीरियड कप वापरू शकता.

४. कडुलिंब अतिशय गुणकारी

कडुलिंब हे अद्भुत गुणकारी आयुर्वेदिक औषध आहे. जे पॅड रॅशपासून मुक्त होण्यास मदत करतात. तुम्हाला फक्त एका भांड्यात पाणी उकळायचे आहे, त्या पाण्यात सुमारे २० कडुलिंबाची पाने टाका आणि थोडावेळ राहू द्या. गॅसवरून पाणी काढा आणि थंड होऊ द्या. पाणी रुम टेम्परेचरवर आल्यावर प्रभावित क्षेत्र धुण्यासाठी वापरा. तुम्ही ते बादलीभर पाण्यात मिक्स करुन त्याने आंघोळही करू शकता. कडुलिंब तुमच्या त्वचेसाठी उत्तम आहे.

५. पर्याय शोधा

पीरियड दरम्यान पॅड वापरताना या पर्यायी गोष्टी लक्षात ठेवा.
मासिक पाळी दरम्यान सिंथेटिक किंवा घट्ट कपडे घालू नका. कारण यामुळे स्थिती वाढू शकते. पॅड वापरत असल्यास सुगंधी पॅड वापरू नका, त्यात केमिकल्सचे प्रमाण जास्त असते.स्वच्छता राखा आणि दिवसातून ३ ते ४ वेळा पॅड बदला. यामुळे संसर्ग होणार नाही. शक्यतो ढगळ, सैल कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

वरिल उपाय हे आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र, हे करतांना तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.