आजकाल सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. शिवाय केमिकल हेअर केअर प्रोडक्ट्सचा वापर आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले आहेत. केस पांढरे होण्यामागचे एक कारण म्हणजे मेलेनिनचे प्रमाण कमी होणे हे आहे. मेलेनिन हे एक प्रकारचे रंगद्रव्य आहे जे आपले केस काळे करते. केस पांढरे होण्यामागचे कारण काहीही असो पण पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे अनेकजण सध्या अस्वस्थ असल्याचं आपणाला पाहायला मिळतं. जर तुम्हालाही पांढऱ्या केसांची समस्या भेडसावत असाल तर तुम्हाला आम्ही आज केस काळे करण्यासाठीचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमचे केस काळे ठेवू शकता.
केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय पुढीलप्रमाणे –
आवळा आणि मेथी –
हेही वाचा- घसा सतत खवखवतोय? तर झटपट आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा
तुम्हाला ६ ते ७ आवळे घ्यावे लागतील. त्यामध्ये तीन ते चार चमचे नारळ आणि बदामाचे तेल मिक्स करावे लागेल.
हे सर्व मिश्रण रंग निघेपर्यंत उकळवा. उकळल्यानंतर ते थंड करा. नंतर त्यामध्ये एक चमचा मेथी पावडर टाका आणि हे तयार झालेले मिश्रण केसांच्या मुळांमध्ये लावा. ते केसांना लावून झोपा आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा. असे केल्याने तुमचे केस काळे राहतील.
कढीपत्ता आणि तेल –
हेही वाचा- तुमच्या मुलांचे डोळे कोरडे पडतायत? तर मग जाणून घ्या त्यामागची कारणे आणि घरगुती उपचार
- केस काळे करण्यासाठी एक कप कढीपत्ता घ्या आणि ते काळे होईपर्यंत उकळा.
- उकळल्यानंतर ते थंड होऊ द्या आणि नंतर त्यात तेल घाला.
- या तेलाच्या मिश्रणाने रात्री केसांना मसाज करा आणि सकाळी केस धुवा.
लिंबाचा रस आणि बदाम तेल –
- केसांच्या आवश्यकतेनुसार बदामाचे तेल घ्या.
- बदामाच्या तेलात लिंबाचा रस मिसळा
- ते मिश्रण तयार झाल्यानंतर केसांना लावा आणि मसाज करा आणि सुमारे 30 मिनिटांनी केस स्वच्छ करा. यामुळे तुमचे केस काळे राहतील शिवाय तसेच पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)