Coconut Oil Pulling: दातांची योग्य काळजी न घेतल्यास ते हळूहळू पिवळे पडू लागतात. पिवळ्या दातांमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. त्याशिवाय दातांची योग्य काळजी न घेतल्याने श्वासाला दुर्गंधी येते. तसेच, जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता तेव्हा त्यांना तुमच्याशी बोलणे खूप अवघड अस्वस्थपणाचे वाटू शकते. त्यामुळे दातांची काळजी घेण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत.
नारळाच्या तेलाने दातांचा पिवळेपणा होईल दूर
जर तुम्हीही दात पिवळे होण्याच्या आणि किडण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर नारळाच्या तेलाने ही समस्या दूर करू शकता. याच्या वापराने तोंडातील त्याज्य घटक आदी सहज साफ करणे शक्य होईल आणि दातांचा पिवळेपणाही लगेच दूर होईल.
नारळाच्या तेलाने दातांची काळजी घ्या
तुम्ही नारळाच्या तेलाने दातांचा पिवळसरपणा दूर करू शकता. दातांवर नारळाचे तेल लावल्याने दातांची स्वच्छता तर होतेच; पण हिरड्यांचे आरोग्यही सुधारते.
दातांवर कसे करावे ऑइल पुलिंग
ऑइल पुलिंग करण्यासाठी सर्वांत आधी एक ते दोन चमचे नारळाचे शुद्ध तेल घ्या. आता ते १०-१५ मिनिटे तोंडामध्ये फिरवून, तोंडाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाईल असे पाहा. काही वेळाने तुम्ही ते थुंका. हा उपाय दररोज केल्याने तर ते तोंडातील जीवाणूंसह कुजलेले अन्नकण आदी सहज साफ करणे शक्य होईल.
हेही वाचा : लॅपटॉप, टीव्हीची स्क्रीन साफ करताना टाळा ‘या’ चुका; नाही तर वाढेल खर्च
नारळाच्या तेलाने ऑइल पुलिंग केल्यानंतर काय करावं?
नारळाच्या तेलाने ऑइल पुलिंगनंतर कोमट पाण्याने दात स्वच्छ धुवा किंवा ब्रशच्या मदतीने दात घासून घ्या. दररोज असे केल्याने दातांचा पिवळेपणा सहज दूर होईल आणि हिरड्यांशी संबंधित सर्व समस्यांपासूनही आराम मिळेल. परंतु, जर तुम्हाला तुमच्या दातांची गंभीर समस्या असेल, तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.