दररोज खूप गोड खाणाऱयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. डोकेदुखी, दातांचे आणि त्वचेचे विकार याचा यात समावेश होते. फूडपांडाच्या प्रवक्त्या रसिका यादव यांनी या समस्यांची यादीच तयार केली आहे. काय आहेत हे या समस्या जाणून घेऊ…
डोकेदुखी – खूप गोड खाणा-या व्यक्तींना जर एखाद्या दिवशी अजिबात गोड पदार्थ खायला मिळाले नाहीत तर त्यांना डोकेदुखीचा त्रास उदभवू शकतो.
भोवळ – अतिगोड खाण्याची सवय असेल आणि एखाद्या दिवशी अजिबात गोड खाल्ले नाही आणि शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक कमी झाले तर संबंधित व्यक्तीला कुठेही भोवळ येऊ शकते आणि ती जमिनीवर कोसळू शकते.
दात घासणे – सतत गोड खाण्यामुळे दातांना किड लागण्याची शक्यता तुलनेत अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींना दिवसातून किमान दोनवेळा किंवा त्यापेक्षा अधिकवेळा दात घासावे लागतात.
दातांतून कळा येणे – गोड खाणा-या व्यक्तींमध्ये हा आजार सर्वसामान्यपणे दिसतोच.
मानसिक सवय – जेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक इतर पदार्थांचा आस्वाद घेत असतात. त्यावेळी तुम्हाला मात्र गोडच पदार्थ खावेसे वाटतात. गोड खाल्ल्याशिवाय भूक भागल्याचे मानसिक समाधान तुम्हाला लाभतच नाही.
चेहऱयावर पुरळ – सतत गोड खाणा-या व्यक्तींच्या चेह-यावर बारीक पुरळही येऊ शकतात.
त्वचेवर परिणाम – अशा व्यक्तींच्या त्वचेवरही परिणाम होतो. त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

Story img Loader