Jackfruit Benefits And Side Effects : उन्हाळा सुरु होताच बाजारात आंब्यांसोबत फसणाची आवक सुरु होते. कापा, बरकासह फसणाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात, कोकणात उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येक घरात एकदा तरी फसणाची भाजी बनवली जाते. पण उन्हाळ्यात फसणाची भाजी किंवा फणस खावा की खाऊ नये याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. कारण फणसाचा प्रभाव उष्ण असतो. याचे कारण म्हणजे फणसाचे उत्पादन उष्ण आणि दमट वातावरणात घेतले जाते. त्यामुळे लोक विशेषतः स्त्रिया फसणाचे सेवन करण्यास कचरतात.
फणसाच्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि पोटाची पचनक्रियाही बिघडते, असे त्यांना वाटते. त्यामुळे उन्हाळ्यात फणस खावा की खाऊ नये याबाबत जाणून घेऊ.
फणसातील पोषक तत्वे
१) फणसातील पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाल्यास त्या जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी बी६, सी, ए, रिबोफ्लेविन, थायामिन तसेच मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज आणि फायबर असे अनेक पोषक घटक आहे. हे सर्व घटक त्वचा आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
२) फसणातील पोषक तत्वांमुळे उन्हाळ्यात ते खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होत नाही, तर फायदाच होतो. त्यामुळे कोणतीही काळजी न करता तुम्ही उन्हाळ्यात फणस खाऊ शकता.
फणस खाण्याचे फायदे
१) फणस खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
२) त्वचेवर चमक येते.
३) हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप चांगले मानले जाते.
४) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही फणस मदत करते.
५) हिमोग्लोबिन वाढते.
६) हाडांसाठी फायदेशीर असतो.
गरोदर महिलांनी फणस खावा का?
फणसात मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे गरोदर महिलांनी त्याचे थोड्याप्रमाणात सेवन करावे, गर्भावस्थेत अधिक प्रमाणात फणस खाल्ल्याने पोट बिघडू शकते.
फणस खाल्ल्यानंतर पोट बिघडल्यास काय करावे?
फणस खाल्यामुळे अनेकांना अपचन होऊ पोट बिघडू शकते. यामुळे जुलाब, पोटफुगीची समस्या जाणवू शकते. फणस खाऊन पोट फुगल्यास लिंबूपाणी प्यावे. यामुळे आराम मिळू शकतो.