Summer Jugaad Video : सध्या उन्हाळा सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आंब्याचा आस्वाद घेत आहे. खरं तर उन्हाळा हा आंब्याचा हंगाम असतो पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की तुम्ही प्रत्येक हंगामात आंब्याचा आस्वाद घेऊ शकता… तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? वर्षभरासाठी आंबे साठवून तुम्ही वर्षभर आंब्याचा आस्वाद घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल वर्षभरासाठी आंबे कसे साठवायचे? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आंबे वर्षभर कसे साठवायचे, याविषयी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षभर आंबे कसे साठवायचे?

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे – सुरुवातीला आंबे स्वच्छ नीट धुवून घ्या. त्यानंतर आंबे पाण्यात एक दोन तास भिजवून घ्या. त्याचा पल्प काढून घ्या. त्यानंतर हा पल्प आइस ट्रेमध्ये घालून फ्रिजरमध्ये सहा ते सात तास ठेवा. त्यानंतर एका झिप्लॉक बॅगमध्ये थोडी साखर घालून आंब्याचे फ्रोझन क्युब्स त्यात घाला आणि फ्रिजरमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा हे क्युब वापरू शकता. याशिवाय आंब्याचे छोटे तुकडे, एका झिप्लॉक बॅगमध्ये साखर घालून डायरेक्ट फ्रिजरमध्ये ठेवू शकता. आंब्याचा पल्प सुद्धा तुम्ही साठवू शकता. फक्त आंब्याचा पल्प बनवताना् दोन ते तीन चमचे साखर घाला आणि हा पल्प झिप्लॉक बॅगमध्ये भरून फ्रिजरमध्ये स्टोअर करा. अशाप्रकारे तुम्ही वर्षभरासाठी आंबे साठवून ठेवू शकता.

हेही वाचा : तुमच्या शरीराला ‘इतकी’ ग्रॅम साखर आवश्यक! यापेक्षा जास्त खाल्ल्यावर ही साखर शरीरात कुठे जाते, काय बदलते? पाहा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : इडली डोसा नियमित का खाऊ नये? आंबवलेले पदार्थ आठवड्यातून कितीदा खाणे चांगले? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

nutribit.app या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शमध्ये लिहिलेय, ” वर्षभरासाठी आंबे कसे साठवून ठेवायचे?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “राहत असेलही पण कोणतेही फळ त्याच्या नैसर्गिक ऋतूमध्ये खाल्लेलच चांगलं आणि हेल्दी असं मला वाटतं” तर एका युजरने लिहिलेय, “मी दरवर्षी अशाप्रकारे आंब्याचा रस काढून स्टोअर करते. वर्षभर व्यवस्थित राहतो रस” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुमची कल्पना चांगली आहे पण माझ्या घरचे एक महिना पण ठेवणार नाही. खाऊन संपवून टाकतील.” काही लोकांना ही ट्रिक आवडली आहे तर काहींनी ताजा आंबा खाल्लेला बरा, असे लिहिलेय.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer jugaad video how to store mangoes for a year do you know trick video goes viral on social media ndj