उन्हाला सुरु झाला की आपल्यापैकी अनेकजण रसाळ आणि पाण्यांचा अंश असलेली फळांचे सेवन करतात. जसे की कलिंगड. कलिंगडमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी हे उत्तम फळ आहे. पण आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीत भेसळ किंवा फसवूक केली जाते त्यामुळे खूप सावधगिरी बाळगावी लागते. अनेक फळे औषध वापरून आणि इंजेक्शन देऊन पिकवले जाते. आज काल बाजारात असे कलिंगड विकले जात आहे ज्यांना कलिंगड देऊ पिकवले जाते किंवा लाल दिसावे म्हणून इंजेक्नशन देऊन रंगवले जाते. दरम्यान चुकूनही अशा फळांचे सेवन केले तर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थिती करायचे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडतो. चिंता करू नका, इंजेक्शन दिलेले कलिंगड ओळखण्यासाठी काही सोपे उपाय आहे जे वापरून तुम्ही सावध राहू शकता.
तुम्हीही बाजारातून कलिंगड आणून खाण्याचा बेत आखत असाल तर थोड थांबा. कलिंगड खाण्यापूर्वी आधी त्याची सोप्या पद्धतीने तपासणी करा आणि खात्री झाल्यानंतर ते खा. आता तुम्ही म्हणाल, कलिंगडला कृत्रिम रंगाचे इंजेक्शन दिले हे कसे ओळखाचे? सोपे आहे.
रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

प्रथन कलिंगड कापा. एका ग्लासात पाणी घ्या. आता त्याचा एक तुकडा कापून त्या ग्लासातील पाण्यात टाका. जर पाण्याचा रंग बदलला नाही तर कलिंगड खाण्यासाठी योग्य आहे जर पाण्याला लालसर रंग आला तर कलिंगड खाण्यासाठी योग्य नाही. अशा कलिंगडला इंजेक्शन दिलेले असू शकते. त्यामुळे असे कलिंगड खाणे टाळा.

इंस्टाग्रामवर chanda_and_family_vlogs नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला कलिंगड कापते आणि त्याचा तुकडा पाण्यात टाकते. पाण्याला हलका लालसर रंग आल्याचे दिसते. म्हणजे कलिंगड इंजेक्शन देण्यात आले हे स्पष्टपणे दिसते आहे.

व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बाजारातून आणलेले कलिंगड खाण्यापूर्वी एकदा तपासणी नक्की करा.

कलिंगड खाण्याचे फायदे

कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे. कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर व लघवीला जळजळ होत असेल तर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो.कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आद्र्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असेल तर कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. थोडय़ाच वेळात शरीराची आग कमी होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer safety alert do not eat watermelon before watching this video how to identify injected watermelon this summer snk