पेटपालकांचा वर्षांतील सर्वाधिक चिंतेचा ऋतुकाळ असतो उन्हाऴा. या काळात माणसे उन्हामुळे तसेच प्राणी आणि पक्षी उष्णतेच्या तडाख्यात होरपळतात. दिवसभर भरपूर खेळणारे श्वान किंवा मांजर दिवसभर कोपऱ्यात शांत पडून राहते. त्यांचे केस गळतात. आडोशाला जाऊन बसलेले पक्षी बोलावले तरी पटकन समोर येत नाहीत. आत्यंतिक नाजूक जातीच्या माशांचा मत्स्यपेटीतील अचानक मृत्यू हा केवळ तापमानात विचित्र बदल झाल्यानेही होतो. बदलत्या ऋतूप्रमाणे प्राण्यांच्या वागणुकीतील बदल हा साहजिक असला, तरी काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक असते. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या तलखीपासून प्राण्यांना दिलासा देणारी अनेक उत्पादने आणि खाणेही बाजारात दाखल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काळजी कशी घ्याल?

उन्हाळ्यात वातावरणातील वाढत्या तापमानानुसार प्राण्यांच्या शरीराचे तापमानही वाढते. त्याचप्रमाणे केस गळणे, कमी खाणे, प्राणी आळसावलेले असणे या कायम दिसणाऱ्या गोष्टी असतात. मात्र त्यापेक्षा वेगळे बदल प्राण्यांच्यात दिसू लागले तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. उन्हामुळे त्वचा भाजणे (सर्न बर्न), श्वास घ्यायला त्रास होणे, उष्माघात (सन स्ट्रोक), शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (डिहायड्रेशन) असे त्रास प्राण्यांनाही होऊ शकतात. पुरेशी काळजी घेतल्यास त्यापासून प्राण्यांची जपणूक करता येते. याबाबत पशुवैद्य डॉ. विनय गोऱ्हे यांनी सांगितले, ‘पहाटे आणि रात्री थोडा गारठा आणि दुपारी कडक ऊन असे विषम हवामान सध्या आहे. त्याचा त्रास प्राण्यांना होऊ शकतो. मोठय़ा आकाराचे ग्रेट डेनसारख्या प्रजातीचे श्वान किंवा चपटय़ा तोंडाचे पग सारख्या प्रजातीचे श्वान यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. श्वान खाणे कमी करतात. काही वेळा विषम हवामानामुळे कोरडा कफही त्यांना होतो. मात्र काळजी घेतली तर हे त्रास टाळता येऊ शकतात.

नव्या उत्पादनांसह बाजारपेठ सज्ज

उन्हाळ्यासाठी अनेक उत्पादने ‘पेट शॉप्स’मध्ये आणि ऑनलाइन बाजारपेठेत दाखल झाली आहेत. त्यातील सध्या चर्चेत असलेले उत्पादन म्हणजे ‘वॉटर फाउंटन्स’ श्वानांना किंवा मांजरांना साठलेल्या पाण्यापेक्षा वाहते किंवा ताजे पाणी पिण्यास आवडते. त्यामुळे अनेकदा भांडय़ात ओतून ठेवलेले पाणी पिण्याऐवजी प्राणी ओरडत राहतात किंवा पाणी पिणे टाळतात. त्यासाठी ‘वॉटर फाउंटन्स’ बाजारात आली आहेत. प्राणी या फाउंटनच्या जवळ आला की पाणी वाहू लागते आणि प्राण्यांना ते पिता येते. त्यातून पाणी वाया जाण्याचे प्रमाणही कमी होते आणि प्राण्यांना कायम थंड आणि स्वच्छ पाणी मिळते. साधारण २५० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत ही फाउंटन्स ऑनलाइन बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय सुती शर्ट, खाण्यातील नवी उत्पादनेही बाजारात आली आहेत.

उपायांचा अतिरेकही नको

उन्हाळा होतो म्हणून श्वानांना रोज अंघोळ घालणे. केस गळतात म्हणून ते कापून टाकणे असे प्रकार अनेक पशू पालक करत असतात. मात्र प्राण्यांना रोज अंघोळ घातल्यास त्यांची त्वचा कोरडी होऊन अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यातही रोज अंघोळ घालू नये. मात्र त्याऐवजी शरीराचे तापमान कमी करण्यासाठी ओल्या फडक्याने अंग टिपता (स्पंजिग) येऊ शकते. केस कापून टाकणेही चुकीचे आहे. त्याची लांबी कमी केल्यास चालू शकते मात्र ते कापून टाकल्यास प्राण्यांची त्वचा उन्हाने भाजण्याची शक्यता असते.

* श्वानांना उन्हात फिरायला नेऊ नये.

* सतत पाणी पिऊन प्राणी आपल्या शरीराचे तापमान आटोक्यात ठेवत असतात. प्राण्यांना दिवसभर स्वच्छ आणि गार पाणी मिळावे.

* उन्हाळा सुरू झाला की प्राणी खाणे कमी करतात. अशा वेळी दिवसभर कमी खाणे दिले तरी चालू शकते. प्राण्यांचे नियमित खाणे हे रात्री किंवा अगदी सकाळी द्यावे. त्याचप्रमाणे ते गरम असू नये.

* या मोसमात काही प्रमाणात प्राण्यांचे केस गळत असतातच. मात्र ते अधिक प्रमाणात गळत असतील किंवा त्याबरोबर त्वचेवर लालसरपणा, एखाद्याच भागावरचे केस जाणे असे काही दिसल्यास पशुवैद्यकांकडे जावे

* मांजराना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर वेळ न घालवता पशुवैद्यकांकडे न्यावे.

* केस गळती काही प्रमाणात कमी होण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या स्प्रे, पावडर्स वापरता येतील.

* घरात गारवा असेल अशा ठिकाणी प्राण्यांना बसण्यासाठी जागा द्यावी.

* पक्ष्यांच्या पिंजऱ्यातही पाणी असावे. त्याचप्रमाणे उन्हापासून पिंजरा दूर ठेवावा, त्यात आडोसा करावा

* अ‍ॅक्वॅरियममधील पाण्याची पातळी सातत्याने तपासावी. पुरेशा प्रमाणात पाणी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.