Turmeric Milk In Summer: लहानपणी आजीचा बटवा ही संकल्पना अस्तित्त्वात होती. किरकोळ आजारांवर घरगुती उपचार करण्यासाठी आजीच्या बटव्यातल्या गोष्टींचा वापर केला जात असे. यामध्ये हळद या घटकाचा प्रामुख्याने समावेश असायचा. हळदीचे असंख्य गुणकारी फायदे आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. यामुळेच आपल्याकडे फार पूर्वीपासून हळदीकडे औषधी वनस्पती म्हणून पाहिले जाते. हळदीप्रमाणे दूध देखील आरोग्यदायी असते असे म्हटले जाते.

डीके पब्लिशिंग हाऊसच्या ‘Healing Foods’ या पुस्तकामध्ये “हळदीमध्ये Curcumin नावाचे संयुग असते. या अँटिऑक्सिडेंट घटकामुळे जखमा बऱ्या होण्यास मदत होते. दूधामध्ये हळद टाकून प्यायल्याने सर्दी, खोकला अशा विविध आजारांवर मात करता येते.” असे लिहिलेले आहे. हळदीच्या सेवनाने शरीरामध्ये उष्णता वाढत जाते असे म्हटले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात हळद मिश्रित दुधाचे सेवन केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. तर काहीजण ही गोष्ट अफवा आहे असे म्हणतात. अशा वेळी उन्हाळ्यामध्ये हळदीचे दूध पिणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न पडू शकतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज देणार आहोत.

Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
youth dies due to hot milk pot fell Shocking video viral
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

हळदीच्या दूधामुळे शरीरातील उष्णता वाढते का?

हळदीच्या सेवनामुळे मानवी शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढून ते गरम होते. आयुर्वेदानुसार, वात, पित्त आणि कफ या तीन दोषांमध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी हळदीची मदत होत असते. या पदार्थाचा गुणधर्म गरम स्वरुपाचा असल्याने त्यांच्या अतिसेवनामुळे शारीरिक संतुलन बिघडू शकते. त्याशिवाय विविध समस्या देखील उद्भवू शकतात.

आणखी वाचा – २८ दिवसात परफेक्ट बॉडी मिळवण्याचा डाएट प्लॅन; वजन कमी करताना दिवसभर कधी व काय खावे?

उन्हाळ्यात हळदीचे दूध पिणे योग्य ठरते का?

हळदीचे दूध वर्षभरात कधीही प्यावे. पण त्याआधी दुधामध्ये किती प्रमाणात हळद मिसळली आहे हे तपासून घ्यावे असे आहारतज्ज्ञ रूपाली दत्ता सांगतात. त्या पुढे म्हणतात, “गरजेपेक्षा जास्त प्रमाणात हळदीचे सेवन केल्याने त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात शरीर नैसर्गिकरित्या गरम होते. अशा वेळी मध्यम प्रमाणात हळद दूध प्यावे. दिवसातून एकदा हळदीचे दूध पिऊ शकता. पण दूधामध्ये एक छोटा चमचा हळद मिसळा. जर जास्तीची हळद पोटात गेली, तर शरीरातील उष्णतेचे प्रमाण हे वाढून विविध समस्या संभावू शकतात.”