Summer skin care tips : उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका आणि फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचे आगमन होते. अत्यंत गोड आणि रसाळ चवीसह या धम्मक पिवळ्या रंगाच्या फळात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व अ, क आणि इ असतात, जे आपल्या आरोग्यासह त्वचेसाठीही फार उपयुक्त असतात. या जीवनसत्वांमुळे त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि वय दिसण्यासारख्या समस्या दूर करण्यास मदत होऊ शकते.

इतकेच नाही तर आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सदेखील भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून, प्रदूषणापासून आपल्या त्वचेचे रक्षण करून, त्यास तुकतुकीत ठेवण्याचे कामसुद्धा आंबा करू शकतो. चेहरा उन्हाळ्यातही उजळ, तुकतुकीत आणि तजेलदार ठेवायचा असल्यास आंब्यापासून घरच्याघरी फेसमास्क कसा बनवायचा पाहूया.

Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

हेही वाचा : Skin care : आला आला उन्हाळा; त्वचेला ‘टॅनिंगपासून’ कसे बरे सांभाळाल? पाहा हा घरगुती फेसपॅक

घरगुती मँगो फेसमास्क [Homemade mango face mask]

साहित्य

१ पिकलेला आंबा
दही अथवा मध

कृती

  • सर्वप्रथम आंबा पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या.
  • आता सुरीच्या मदतीने आंब्याचे साल काढून घ्या. मात्र सलाबरोबर फळाचा फारसा गर येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • आता आंब्याच्या सालाचे बारीक तुकडे चिरून मिक्सरमध्ये घाला. यामध्ये तुम्हाला हवे असल्यास एक चमचा दही अथवा मध घालू शकता.
  • आंब्याचे साल मिक्सरमध्ये वाटून छान बारीक पेस्ट करून घ्या.
  • आपला आंब्याचा फेसमास्क तयार आहे.

हेही वाचा : भांडी घासताना तुम्हीही वापरताय गरम पाणी? जरा थांबा; स्वच्छ, चमकदार भांड्यासाठी पाहा ‘या’ Tips

वापर

  • सर्वप्रथम पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
  • आता तयार केलेला आंब्याचा मास्क बोटांनी किंवा ब्रशच्या मदतीने डोळ्याखालील भाग सोडून, संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या.
  • हा मास्क चेहऱ्यावर साधारण १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याच्या मदतीने चेहरा पुन्हा स्वच्छ करून घ्या.
  • एखाद्या मऊ टॉवेलच्या मदतीने चेहऱ्यावरील पाणी टिपून घ्यावे.
  • शेवटी चेहऱ्यावर तुमच्या आवडीचे मॉइश्चराइजर लावून घ्या.
  • हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करू शकता, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते.

[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]