Summer Superfoods : उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे असते. पण, सध्या धावपळीच्या जीवनात कधीकधी हे शक्य होत नाही, आपण गरज असतानाही पुरेसं पाणी पित नाही, अशावेळी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून शरीर हायड्रेट ठेवू शकता. उन्हाळ्यात नेमके पदार्थ खाऊन तुम्ही शरीर हायड्रेट ठेवू शकता, जाणून घेऊ…
नारळ पाणी
उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करायलाच हवा. कारण नारळ पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. हे प्यायल्याने उष्णतेमुळे होणारे डिहायड्रेशन आणि थकवादेखील दूर होतो.
काकडी
तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू शकता. कारण काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. यामुळे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी राहते.
दही आणि ताक
उन्हाळ्यात दही आणि ताक खाणे खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि पोटही भरल्यासारखे वाटते. या दोन्ही पदार्थ्यांच्या सेवनाने पोटाच्या समस्याही दूर होतात.
पुदिना आणि कोथिंबीर
तुम्ही तुमच्या आहारात पुदिना आणि कोथिंबीरचा समावेश केला पाहिजे. तुम्ही त्याची चटणीही बनवून खाऊ शकता, कारण हे पदार्थ शरीराला थंडावा ठेवण्यास मदत करतात. चटणी व्यतिरिक्त तुम्ही लिंबू सरबतामध्ये पुदिन्याच्या पानांची बारीक पेस्ट मिक्स करूनदेखील पिऊ शकता.
बेलाचे सरबत
उन्हाळ्याच्या हंगामात बेल बाजारात येऊ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही त्याचे सरबत बनवू शकता. हे प्यायल्याने अॅसिडिटीपासून आराम मिळतो, तसेच शरीर थंड आणि हायड्रेट ठेवता येते.