Heat Rashes and Sunburns : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे जितके महत्वाचे असते. तितकीच उन्हाळ्यातही घेणे महत्वाची असते. कारण या ऋतूमध्ये उन्हाळामुळे खूप घाम येतो आणि घामामुळे घामोळे येतात. घामोळ्यांमुळे त्वचेवर लालसरपणा, जळजळ, खाज सुटते. अनेकांना कपाळावर, पाठीवर, गळ्यावर, कमरेवर घामोळं येतात, या घामोळ्यांमुळे अंगावर कपडे घालणेही अनेकदा कठीण होऊन जाते. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घामोळ्यांपासून सुटका मिळवू शकता.

घामोळ्यांवर घरीच करा ‘हे’ ६ उपाय

१) कोरफड

कोरफड हे घामोळ्यांवर उपचारांसाठी फायदेशीर ठरु शकते. यात दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे घामोळ्यांमुळे येणारा लालसरपणा कमी होतो. कोरफड व्हेरा जेल कूलिंग इफेक्ट आहे, ज्यामुळे रॅशेसशी संबंधित जळजळ कमी होते. तु्म्ही कोपड जेल घामोळ्यांवर लावा आणि ती १५ ते २० मिनिटे राहू द्या.

Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
Farmers Problem and Bail Pola 2024 Celebration News in Marathi
Bail Pola Festival 2024 : बैलांचा साज महागला, संकटग्रस्त शेतकऱ्यांमुळे पोळ्यावर निराशेचे सावट
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत

२) ओट्स

ओट्स हा आणखी एक नैसर्गिक उपाय आहे. ज्यामुळे तुम्ही उष्णतेमुळे जाणवणाऱ्या समस्येपासून आराम मिळवू शकता. ओट्सचा चिकटपणा खाज, पुरळ आणि घामोळ्यांमुळे जाणवणारी उष्षता कमी करते. यासाठी तुम्ही एक कप ओटची बारीक पावडर करुन घ्या आणि पाण्यात मिसळा. आता ही पेस्ट ज्या भागी जळजळ होतेय तिथे लावा आणि किमान १५ मिनिटे राहू द्या.

३) बेकिंग सोडा

बेकिंग सोडा उष्णतेमुळे येणारे घामोळे, खाज यावर उपचार करण्यास मदत करू शकतो. सोड्यामधील एक्सफोलिएटर घटक तुमच्या शरीरातील मृत त्वचेच्या पेशी काढतो. यामुळे घामोळ्यांवर उपचार करण्यासाठी बेकिंग सोडा एका थंड पाण्यात टाका, आणि एक कापड त्या पाण्यात भिजवा आणि प्रभावी भागावर लावा.

४) बटाटा

बटाटा प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतो जो घामोळ्यांवर उपचार करणयासाठी वापरू शकता. बटाट्यातील गुणधर्म त्वचेला शांत करण्यात आणि खाजेपासून आराम देण्यात मदत करतात. यासाठी एक बटाटा कापून तो घामोळ्यांवर लावा. कमीतकमी १५ मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

६) खोबरेल तेल

खोबरेल तेल हा आणखी एक नैसर्गिक उपाय आहे जो उन्हाळ्यातील घामोळ्यांवर उपचार करण्यास मदत करू शकतो. खोबरेल तेलामध्ये फॅटी ऍसिड ते उष्णता कमी करण्यात मदत करते. तसेच संसर्ग रोखण्यासाठी हे प्रभावी आहे. थोडेसे खोबरेल तेल घ्या आणि प्रभावित भागावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. काही वेळ राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

७) मुलतानी माती

मुलतानी मातीमध्ये वेदनाशामक आणि दाहकविरोधी गुणधर्म आहे ज्यामुळे त्वचेवरील पुरळ, घामोळांमुळे जाणवणारी उष्णता, खाज कमी होते. यासाठी अर्धा चमचा मुलतानी मातीचे मिश्रण पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि ती प्रभावित भागावर लावा.