सूर्यफुलाच्या बियांकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो. तेल काढण्यापलीकडे त्यांचा फारसा काही उपयोग नाही असं अनेकांना वाटतं. पण या बिया आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन–ई, कॅल्शियम, खनिजे अशी अनेक पोषणद्रव्ये असतात. त्यामुळे रोजच्या आहारात सूर्यफुलांच्या बियांचा समावेश केला तर नक्कीच आरोग्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. तेव्हा या बियांचा नेमका कसा वापर करता येईल हे जाणून घेऊ.

Hair Care Tips : हेअर कट कितीवेळा करावा?

– भाजलेल्या किंवा खारवलेल्या सूर्यफुलाच्या बिया या उत्तम आणि आरोग्यदायी मानल्या जातात. न्याहरीसोबत बिया खाणं फायदेशीर ठरतं.
– सूर्यफुलाच्या बिया खाल्लाने मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी यासारखे त्रास कमी होतात.
– सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणत असते त्यामुळे केसांसाठी ते फायदेशीर ठरतं.
– सलाडमध्येही सूर्यफूलाच्या भाजलेल्या बिया टाकून खाल्ल्यास सलाडही अधिक पौष्टिक होतं.
– सूर्यफुलांच्या बियामध्ये कॅल्शिअमही खूप असते त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया खाणं फायदेशीर ठरतं.

पायांना भेगा पडताहेत? ‘हे’ पाच उपाय करून पाहा