Benefits Of Sunflower Seeds For Hair : हवामानातील वाढते प्रदूषण, सूर्यकिरणांचा प्रभाव, केसांची निगा राखणारी रासायनिक उत्पादने, हेअर स्टायलिंग हीटिंग टूल्सचा वापर आदी अनेक गोष्टींमुळे महिलांच्या केसांचे नुकसान होत चालले आहे. पण, काही महिलांच्या केसांचे नुकसान शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होत असते. त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही शक्यतो रासायनिक उत्पादनांचा वापर कमी करा आणि हीटिंग टूल्सचा वापर टाळा. त्यावर उपाय म्हणून सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds) तुमच्या केसांच्या समस्यांना तोंड देण्यास मदत करू शकतात. केसांच्या आरोग्यासाठी त्यांचा आहारात समावेश करा किंवा मग सूर्यफुलाचे तेल केसांना लावणे तुमच्यासाठी सोईस्कर ठरेल.

सूर्यफुलाच्या बिया केसांच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे जाणून घेऊ…

केसांच्या समस्यांची आकडेवारी

‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’ने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ४० टक्के भारतीय महिलांना ४० वर्षांच्या वयापर्यंत केसगळतीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर २० ते ३० टक्के भारतीय महिलांना २०२० मध्ये केस पातळ होणे किंवा जास्त प्रमाणात केस गमावण्याचा अनुभव आला. ६०.८ टक्के महिलांनी केसांची घनता कमी असल्याची तक्रार केली. त्याच वेळी ३० वर्षांखालील ६३ टक्के महिलांना केसांच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागला.

Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
diwali Bhau beej 2024 google trending news
Bhau Beej 2024 : ‘भाऊबीज’ सण महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ‘या’ नावांनी केला जातो साजरा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Stop Reheating Your Tea! Expert Shares 3 Ways It Could Be Harming Your Health
चहाप्रेमींनो, थंड चहा पुन्हा गरम करून पिता? मग आताच थांबा, अन्यथा होतील ‘हे’ गंभीर परिणाम

केसांसाठी सूर्यफुलाच्या बियांचे फायदे (Sunflower Seeds) :

केसांचे कंडिशनिंग : सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले आवश्यक फॅटी ॲसिड तुमच्या केसांना पुरेसा ओलावा देते आणि त्यामुळे खराब झालेले केस दुरुस्त होण्यास मदत मिळते. त्यामुळे केसांचे टेक्श्चर सुधारते आणि केस मऊ होतात. त्याचबरोबर केसांवर एक संरक्षणात्मक थरसुद्धा तयार होतो; जो वातावरणातील प्रदूषणाने होणारे नुकसान टाळण्यासाठी साह्यभूत ठरतो. अशा प्रकारे तुमचे केस निरोगी आणि मजबूत होऊ शकतात.

निरोगी केसांच्या वाढीस मदत : सूर्यफूलाच्या बिया (Sunflower Seeds) केसगळती कमी करून, केसांच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये गॅमा-लिनोलेनिक ॲसिड नावाचे एक संयुग असते, जे केसांना कंडिशनिंग आणि केसांच्या कूपांना उत्तेजित करण्यास मदत करू शकते. हे केसांचे नुकसान करणाऱ्या घटकांवर कार्य करून, निरोगी केसांच्या वाढीचे चक्र सुधारण्यास मदत करते.

हेही वाचा…Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत

केसांना मुळांपासून ताकद : सूर्यफुलाच्या बियांमधील बी ६ व बी ७ (बायोटिन) ही जीवनसत्त्वे केस मजबूत करून, केसगळतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मजबूत केसांसाठी तुमच्या आहारात सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करण्याप्रमाणेच तुम्ही त्यांचा वापर केसांना लावण्यासाठीही करू शकता.

केसांचे संरक्षण : सूर्यफुलाच्या बियांच्या अर्काने केसांना संरक्षण मिळते. हा अर्क केसांवर एक संरक्षणात्मक थर तयार करतो. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, रंग बदलणे आणि केस पिवळसर होणे या समस्या कमी होतात. त्याचबरोबर हा अर्क आपल्या केसांना हानिकारक सूर्याच्या किरणांपासूनही सुरक्षित ठेवतो.

केसांच्या आरोग्यासाठी सूर्यफूलाच्या बिया (Sunflower Seeds) वापरण्याचे मार्ग :

नाश्त्यामध्ये समावेश करा: तुम्ही सूर्यफुलाच्या बिया कोरड्या भाजून घ्या आणि नंतर त्या तुमच्या नाश्त्यामधील पदार्थामध्ये मिसळून खा. या बियांमधील ओमेगा फॅटी ॲसिड, इतर जीवनसत्त्वे, खनिजे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

हेअर मास्क : सूर्यफूलाच्या बियांचा हेअर मास्क तयार करण्यासाठी सूर्यफूलाच्या बिया, मध, ॲव्होकॅडो (पर्यायी) घ्या. सर्वप्रथम सूर्यफुलाच्या बिया मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर त्यात थोडे पाणी घाला आणि मग त्यात मध, स्मॅश केलेला ॲव्होकॅडो घाला. आता हे मिश्रण केसांना लावा आणि स्कॅल्पला मसाज करा. नंतर २० ते ३० मिनिटे ते तसेच राहू द्या. नंतर केसांना शॅम्पू आणि कंडिशनर लावून, केस व्यवस्थित धुऊन घ्या.

सूर्यफूलाच्या बियांचे तेल : सूर्यफूलाच्या बियांचे तेल केसांना मजबूत करण्यासाठी एक खास उपचार म्हणून वापरले जाऊ शकते. सूर्यफूलाच्या बियांचे तेल केसांना मजबूत करण्यासाठी एक खास उपचार म्हणून वापरले जाऊ शकते. तुम्ही दररोज केसांना जे तेल लावता त्यात सूर्यफूलाच्या बियांच्या तेलाचे थेंब मिसळा, केसांना लावा आणि नंतर केस स्वछ धुवून घ्या.

सनफ्लॉवर सीड्स हेअर सीरम : सूर्यफुलाच्या बियांपासून (Sunflower Seeds) केसांचे सीरम तयार करण्यासाठी, सूर्यफुलाच्या तेलात थोडे व्हिटॅमिन ई तेल मिसळा आणि हे मिश्रण आपल्या केसांच्या टोकांवर लावा. असे केल्याने केसांना फाटे फुटणे थांबेल आणि केस चमकदार व मऊ बनतील.