कमी रक्तादाबाचा त्रास सहन करावा लागणाऱ्यांसाठी थोडा दिलासा देणारे वृत्त आहे. कमी रक्तदाब असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. मात्र, नव्याने करण्यातआलेल्या संशोधनातून सुर्यप्रकाशामुळे हा त्रास टाळला जाऊ शकतो असे सिध्द करण्यात आले आहे.
सुर्यप्रकाश त्वचेमार्फच शरिरातील रेणु व न्यूट्रीक ऑक्साईड यांच्यामध्ये संतुलन घडवतो. परिणामी रक्तदाब देखील संतुलीत राखण्यास मदत होत असल्याचा दावा साउथॅंप्टन आणि इडनबर्ग विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. रक्तातील संदेशवाहक लहान परमाणू स्तरावर होणाऱ्या सुर्य़प्रकाशाच्या परिणामामुळे हृदयविकाराचा त्रास टळत असल्याचे हा अभ्यास म्हणतो.
“सुर्यप्रकाशामुळे रक्तवाहीण्या प्रसरण पावतात. त्यामुळे रक्तदाबामध्ये संतुलन होवून हृदय विकारापासून दिलासा मिळतो,” असे साउथॅंप्टन विद्यापीठाच्या एक्स्पिरीमेंटल मेडिसिन आणि जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक मार्टीन फिलिश्च यांनी सांगितले.
या अभ्यासा दरम्यान २४ निरोगी व्यक्तीवर प्रयोग करण्यात आले. या २४ जणांवर २० मिनीट प्रखर सुर्यप्रकाशाच्या किरणांचा वापर करण्यात आला. त्यामधून हे निष्कर्ष काढल्याचे संशोधकांनी अहवालामध्ये नोंदवले आहे. हा अभ्यास त्वचाविज्ञान शोधनिबंधामधून प्रसिध्द करण्यात आला आहे.       

Story img Loader