पावसाळ्यात अनेक आजार तोंड वर काढतात. या हंगामात त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. दमट हवामान आणि आर्द्रतेमुळे त्वचेचे रोग होऊ शकतात. त्यामुळे या काळात त्वचेची चांगली काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, पावसाळ्यात अॅलर्जी आणि फ्ल्यू देखील होण्याची शक्यता असते. अशात चांगले आहार घेणे गरजेचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोषणतज्ज्ञ रुतुजा दिवेकर यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून ब्लड शुगर लेव्ह, बद्धकोष्ठता, डोळ्यांखाली होणारे डार्क सर्कल्स, केस गळती या सारख्या समस्यांपासून बचाव करण्यास फायदेशीर ठरणारे काही अन्न पदार्थ सुचवले आहेत.

(वजन कमी करण्यात ‘हे’ सुके मेवे ठरू शकतात फायदेशीर, जाणून घ्या)

१) सातूचे पीठ

चना डाळ, गहू आणि तांदळाच्या पिठाणे बनलेले सत्तू आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सत्तू हे शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शिमय, विटामिन, फोलिक अॅसिड देते. सत्तू मासिक पाळीतील पोट दुखी कमी करते, डोळ्यांखाली होणारे डार्क सर्कल कमी करते, असे दिवेकर सांगतात.

२) कणीस

कणीसमध्ये विटामिन बी आणि फोलिक अॅसिड असते जे चांगले केस देण्यात मदत करतात, तसेच त्यांना करडा रंग येऊ देत नाही. तसेच कणीसातील फायबर बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. तसेच ते रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित करते, असे दिवेकर सांगतात.

(मुग डाळ प्रोटीनचा मोठा स्रोत, पण ‘या’ लोकांनी खाणे टाळावे, कारण..)


३) खजूर

खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहे जे बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. कॅल्शियम मॅग्नेशिय शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करते. विटामिन सी त्वचेला नुकसान होऊ देत नाही.

४) जॅकफ्रुट सिड्स

जॅकफ्रुट रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते, तसेच ते हाडांना देखील मजबूत करते. जॅकफ्रुट सिड्समध्ये पोलिफेनॉल्स असतात जे तुमची त्वचा सुंदर ठेवतात. झिंक आणि इतर मिनरल्स हे प्रजनन क्षमता आणि हार्मोनल आरोग्य वाढवातात.

५) डाळी

डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो अॅसिड, विटामिन्स आणि मिनरल्स असतात जे आरोग्याला चांगले ठेवतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Super foods to remain healthy in monsoon ssb