प्रेमात मनाविरुद्ध घडणाऱया घटना आरोग्यावर परिणाम करणाऱया ठरतात असे म्हटले जाते परंतु, दुसऱया बाजूला आपल्याला प्रत्येक बाबतीत योग्य पाठिंबा देणारा जोडीदार असला की आरोग्यासाठी चांगले असते असे एका अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.
या अभ्यासानुसार, दोघांनाही एकमेकांडून योग्य पाठिंबा मिळत असेल तर, त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यावरून आरोग्याची सुस्थिती जोडीदाराच्या पाठिंब्यावर अवलंबून असते असे समोर आले आहे. प्रत्येकाच्या आश्वासकपणामध्ये फरक असतो, प्रत्येकाच्या स्वभावतही फरक असतो परंतु, जोडीदारांचा स्वभाव कसाही असला पण, त्यांचा एकमेकांना योग्यवेळी पुरेपूर पाठिंबा मिळत असला, तर असा जोडीदार आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरत असल्याचे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
अनेकांचे ब्रेकअप होण्यामागचे कारण एकाच वेळी दोघांमध्ये परस्परविरोधी इच्छांचा संचार होणे असते असेही आढळून आले आहे. त्यामुळे पाठिंबादायक जोडीदार मिळणे जितके महत्वाचे असते तितकेच ते दोघांच्या आरोग्यासाठीही लाभदायक असल्याचे यातून समोर आले आहे.

Story img Loader