माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रीचा उत्कृष्ट फिटनेस पाहून तिच्या वयाबद्दल कोणीही फसू शकते. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सुष्मिता सेन आजही सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते. या वयातही सुष्मिता तिचा फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत करताना पाहायला मिळतय. सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि वेळोवेळी तिच्या वर्कआउटचे व्हिडीओ नेहमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अभिनेत्री सुष्मिता सेन आजही तिच्या फिटनेसवर खूप लक्ष देते. सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती व्यायामाचे व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड करत असते. सुष्मिता ही हेडस्टँड, पुश अप ऑन बॉल, क्रंच इत्यादी अनेक प्रकारचे व्यायाम करत असते. तुम्हालाही वयाच्या ४६ व्या वर्षी सुष्मितासारखे छान दिसायचे असेल तर तिच्या व्यायाम पद्धतींबद्दल जाणून घ्या.
पोहणे
सुष्मिताला पोहण्याची आवड आहे. पोहणे हा कार्डिओ व्यायाम आहे. हे तुमच्या हृदयाचे ठोके वाढवून कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. याचा सराव केल्याने शरीरातील अनेक स्नायू एकाच वेळी सक्रिय होतात. त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
मेडिसीन बॉल प्लेंक
हा व्यायाम शारीरिक संतुलन सुधारण्यासाठी केला जातो. हा व्यायाम करण्यासाठी, मेडिसीन बॉल मांडीच्या खाली ठेवा आणि दोन्ही हात खांद्याच्या अगदी खाली ठेवा. शक्य तितक्या वेळ या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.
शीर्षासन
शीर्षासनामुळे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे डोके आणि मेंदूशी संबंधित आजारांपासून तुम्ही दूर राहाल. सुष्मिता शरीराच्या ताकदीसाठी शीर्षासन करते. शीर्षासन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हे आसन एखाद्या भिंतीचा आधार घेऊन करा. जेणे करून पडण्यापासून वाचू शकता म्हणजे तुमची पाठ भिंतीकडे असावी. दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवून हाताचे कोपरे जमिनीवर ठेवा. हाताच्या बोटाना एकत्र करून पकड घट्ट करा. नंतर डोकं तळहाताच्या जवळ जमिनीवर टिकवून द्या. असं केल्यानं डोक्याला आधार मिळेल. यानंतर गुडघे जमिनीपासून वर उचलून पाय लांब करा.हळू हळू पाऊले टाकत कपाळ पर्यन्त घेऊन या नंतर हळुवारपणे गुडघे दुमडून नंतर हळूहळू वर करत पाय सरळ करा. शरीराचा भार पूर्णपणे डोक्यावर टाका.
बाइसेप्स कंसंट्रेशन
या व्यायामाच्या मदतीने तुम्ही बायसेप्सचे स्नायू मजबूत करू शकता. हा व्यायामाचा प्रकार करण्यासाठी, बेंचवर बसा आणि खांद्यांपेक्षा पाय अधिक उघडा. आता उजव्या हातात डंबेल घ्या आणि कोपर उजव्या गुडघ्यावर ठेवा. यानंतर डंबेल उजव्या खांद्यावर आणा आणि तीच प्रक्रिया डाव्या हाताने करा.