Sweating Problem In Summer Season: प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये घामाच्या ग्रंथी असतात. घामामार्फत शरीरातील हानिकारक द्रव्ये बाहेर पडत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रणामध्ये राहावे यासाठी घाम येणे फायदेशीर असते. पण काही वेळेस ही गोष्ट कटकटीची ठरते. घामामुळे शरीराला दुर्गंधी येते. एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी घामाघूम होऊन गेल्याने समोरच्या व्यक्तीवर बॅड इम्प्रेशन पडण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात बाहेरचे वातावरण गरम असल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात यावे म्हणून जास्त प्रमाणात घाम येत असतो. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी-कमी होत असते. अशा वेळी डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यामध्ये अतिघाम येण्याला तुम्ही कंटाळला असाल, तर तुम्ही या सोप्या टिप्स नक्की फॉलो करु शकता. या टिप्समुळे हा त्रास कमी होऊ शकतो.

diabetes, health issue, tips
Health Special: डायबिटीस होण्याची कारणं काय आहेत? – भाग १
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
How To Manage Cold Naturally Without Medication Home Remedy For Cold And Cough
हवा बदल झाल्याने सर्दी-कफाने बेजार? पाच सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम, वाटेल फ्रेश
what happens to the body when your hemoglobin level is consistently high
हिमोग्लोबिनची पातळी सतत वाढल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? वाचा डॉक्टरांचे मत
Stop Throwing Out Banana Strings
Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
video shows sofa Made From Broken Chairs
VIRAL VIDEO : तुटलेल्या गोष्टी जोडण्याची कला, दोन माणसं बसतील असा बनवला सोफा; पाहा तरुणांचा जुगाड
October heat, monsoon, October heat news,
Health Special : ऑक्टोबर हिट सुरु होताना काय काळजी घ्यावी?
BRI method for measuring obesity
What is BRI: निरोगी शरीर ओळखण्याची नवी पद्धत, जाणून घ्या BRI म्हणजे काय? BMI पेक्षा ते वेगळं कसं?

तिखट पदार्थ खाणे टाळावे.

भारतीय पदार्थांमध्ये गरम आणि तिखट मसाल्याचा वापर केला जातो. असे तिखट पदार्थ खाल्याने जास्त प्रमाणात घाम येण्याची शक्यता असते. म्हणून उन्हाळ्यात तिखट खाद्यपदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

भरपूर पाणी प्यावे.

मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्यायल्याने शरीराला खूप फायदा होतात. उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते. यात ज्या लोकांना जास्त घाम येतो, त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. दररोज किमान आठ ग्लास पाणी प्यायल्याने घामाचे प्रमाण कमी होते. Liquid Diet हा पर्याय देखील उत्तम समजला जातो.

आणखी वाचा – उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या ठरु शकते धोकादायक; ‘ही’ ३ लक्षणे दिसल्यास लगेच करावेत उपचार

ताजे टोमॅटो खावे.

टोमॅटोच्या सेवनामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. सलाडमध्ये वापर करुन किंवा रस बनवून टोमॅटोचे सेवन करणे योग्य मानले जाते.

आणखी वाचा – उन्हाळ्यात सायनसचे प्रमाण का वाढते? हा त्रास कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते?

ग्रीन टी प्यावी.

ग्रीन टीमुळे कमी घाम येतो असे म्हटले जाते. याच्या सेवनामुळे शरीराला इतर फायदे देखील होत असतात. अधिवृक्क ग्रंथी (Adrenal gland) ग्रंथीमुळे घाम येत असतो. कॅफीनच्या सेवनामुळे या ग्रंथी उत्तेजित होतात. परिणामी जास्त घाम येतो. म्हणून उन्हाळ्यात चहा, कॉफी यांच्याऐवजी ग्रीन टी प्यावी.

उन्हाळ्यात घामामुळे शरीराला घाणेरडा वास येत असतो. यावर उपाय म्हणून अ‍ॅंटीपरस्पिरेंटचा (Antiperspirant) वापर करावा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)