गोडथंड हिवाळा संपून आता उन्हाळा सुरू झालाय. हळूहळू उष्मा वाढतो आहे. आता गरमागरम ऐवजी थंडगार पदार्थाचा मोसम सुरू होणार. आज एक वेगळा प्रकार पाहूयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

अंजीर, सफरचंद, अननस, पपई, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, संत्री, कलिंगड, टरबूज. यातील तुम्हाला आवडतील अशी कोणतीही फळे घेता येतील. केळं वापरू नये कारण ते काळं पडतं. मोसमातील फळे घेतल्यास अधिक योग्य. दूध, विरजणासाठी किंचित दही, मध, सुका मेवा.

कृती

सर्व फळे स्वच्छ धुवून छान बारीक चिरून घ्यावीत. कोमट दुधाचे विरजण लावून त्यात ही फळे घालून झाकून ठेवून द्यावीत. उन्हाळा असल्याने चारेक तासात दही लागते. ही फळांची सुंदर कोशिंबीर तयार झाली. आता यामध्ये आवडीप्रमाणे मध, सुका मेवा घालून खा. अगदी आवडत असेल तर मेपल सिरप, चॉकलेट सॉस असे काहीही घालून खाता येईल. दही लावायला वेळ नसेल तर साध्या दह्य़ातही फळे मिसळून घेऊ शकता. पण वरील प्रक्रियेत फळांचा रस दह्य़ात मिसळून जी गोडी येते, ती चवीला फार छान असते.