Uric Acid Remedies: शरीरातील युरिक ऍसिडचे वाढते प्रमाण हे अनेक आजारांना आमंत्रण ठरू शकते. अनेकदा अनेकांना हे जाणवतही नाही कि आपल्याला होणारा त्रास हा युरिक ऍसिडमुळेच होत आहे, हे नुकसानकारक आम्ल शरीरावर लपून आघात करत असते. शरीरातील युरिक ऍसिड वाढताच शरीरच आपल्याला काही संकेत देत असते. उदाहरणार्थ तुमच्या चेहऱ्याला किंवा होता पायांना सतत सूज येत असेल, सांधे दुखीचा त्रास होत असेल तसेच चालताना-बसताना पायात कळ येत असेल तर शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असू शकते. डॉ. अमरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरात युरिक ऍसिड वाढल्याने सांधे दुखीचा त्रास सुरु होतो, विशेषतः उठताना बसताना या व्यक्तींना सतत आधार घ्यावा लागतो व तरीही वेदना कमी होत नाहीत.

अनेक आजारांमागे मुख्य कारण हे आपला आहार असते. अधिक प्युरीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरातील युरिक ऍसिड वाढू लागते. ऍसिडिटी झाल्यावर आंबट पदार्थ खाऊ नयेत असे आपणही ऐकून असाल पण युरिक ऍसिडच्या बाबत काही आम्लयुक्त फळच आराम देण्याचे काम करू शकतात.आज आपण युरिक ऍसिड कमी करण्यात मदत करणाऱ्या काही फळांची माहिती व त्यांचे फायदे जाणून घेणार आहोत.

Vinod Kambli Reaction , Bhiwandi Hospital,
मी धावायला तयार.. रुग्णालयात उपचारासाठी दाखल विनोद कांबळी यांची पहिली प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
what post dinner sugar cravings are doing to your sleep metabolism and health
रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय ठरतेय धोकादायक! झोपेसह आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम, वाचा….
ONION
कांदा तुम्हाला का रडवतो? जाणून घ्या कारण…
Why does winter make you more vulnerable to colds
हिवाळ्यामुळे तुम्हाला सर्दी होण्याची अधिक शक्यता का असते? तज्ज्ञांनी केला खुलासा….
What is the best way to eat amla
आवळा खाण्याचा उत्तम मार्ग कोणता? ‘ही’ जुगाड वापरून पाहा, गायब होईल सर्व तुरटपणा, मिळतील दुप्पट फायदे

संत्र- लिंबू

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी शरीराला ‘व्हिटॅमिन सी’ ची प्रचंड मदत होऊ शकते. लिंबू, संत्र ही फळे ‘क’ जीवनसत्वाचा खजिना मानली जातात. लिंबू व संत्र्यातील सायट्रिक ऍसिडमुळे शरीर डिटॉक्स होण्यात मदत होते. परिणामी युरिक ऍसिडचे प्रमाणही कमी होऊ शकते.

एकदा बर्थ कंट्रोल गोळी घेतल्यावर भविष्यातही बाळ होऊ शकत नाही का? वंध्यत्वाविषयी काय सांगतात तज्ज्ञ, पाहा

केळी


केळ्यातील केटोन्समुळे युरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. युरिक ऍसिड वाढण्याआधीच त्याचे उत्पादन थांबवण्याचे काम केळ्यातील कार्बोहायड्रेट , व्हिटॅमिन सी व पोटॅशियम करतात. केल्याच्या सेवनानारे पचनक्रियाही सुधारण्यास मदत होते.

सफरचंद

सफरचंद हा जवळपास अनेक आजारांवर गुणकारी उपाय मानला जातो. पण युरिक ऍसिडच्या रुग्णांनी लक्षात घ्यायची बाब अशी की सफरचंदात मैलिक ऍसिड असते. या आम्लामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, परिणामी रक्तशुद्धीसाठी ही याचा फायदा होऊ शकतो.

सेक्समुळे स्तनांचा आकार वाढतो का? ‘या’ ७ कारणांनी अचानक वाढू शकते Breast Size

चेरी

चेरी हे तसे सीझनल फळ आहे पण जेव्हा शक्य असेल तेव्हा चेरीचे सेवन करणे युरिक ऍसिडच्या रुग्णांना फायदेशीर ठरू शकते. चेरीमध्ये एंथोसायनिन नामक एक अँटी- इन्फ्लेमेंटरी गुण असतो याचा वापर युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी होतो.

(टीप- वरील माहितीस वैद्यकीय सल्ला समजू नये)

Story img Loader