Swelling in Ankles: मेडिसिन प्लसच्या एनसायक्लोपीडियामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात आढळून आले होते की, अनेकदा शरीरात साचलेले द्रव हे गुरुत्वाकर्षणामुळे पायाच्या खालच्या भागात पोहोचू शकते ज्यामुळे पाय व घोट्यांना सूज येऊ शकते. ही सूज फक्त घोट्यांवरच नाही तर पाय, पोटऱ्या व मांड्यांपर्यंत पोहोचू शकते. सूज काहीवेळा वेदनारहित सुद्धा असू शकते पण म्हणून याकडे दुर्लक्ष करणे हे अजिबातच हिताचे ठरणार नाही. एखाद्या विकाराचे किंवा त्रासाचे मूळ लक्षात घेतल्यास त्यावर उपाय शोधणे सुद्धा सहज होते यामुळेच आज आपण घोट्यांना सूज का येते व त्यावर आपल्याला काय उपाय करता येऊ शकतो हे पाहणार आहोत.

घोट्यांना सूज आल्याचे कसे ओळखावे?

इन्फॉर्म्डहेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात सांगितल्याप्रमाणे खालील लक्षणांकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे

Kidney Damage Symptoms
किडनी खराब होण्याआधी शरीर देतं ‘हे’ ८ संकेत; वेळीच ओळखा अन् मूत्रपिंड निकामी होणे टाळा
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Kidney Disease Or Kidney Stone
किडनी निरोगी ठेवायचीय? हे आहेत सोपे अन् तितकेच प्रभावी घरगुती उपाय
This is the best time to eat sugar known expert opinion
गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Diabetes Patients Can Eat Custard Apple Does It Increase Weight and PCOD Signs Know The Truth From Expert
सीताफळ खाल्ल्याने वजन वाढते का? डायबिटीज व PCOD रुग्णांनी तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला नक्की वाचा
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Stomach Gas
पोटात गॅस वाढवतात ‘हे’ ४ पदार्थ; पण ‘हा’ उपाय केल्यास मिळू शकतो झटक्यात आराम
  • घोट्याच्या अवतीभोवतो आणि पायांवर सूज.
  • घोट्याच्या आजूबाजूचा भाग घट्ट किंवा जड होणे
  • त्वचा ताणलेली दिसणे
  • पिटिंग एडेमा म्हणजे सुजलेल्या भागावर दाबल्यास काही सेकंद तिथे खोक/खड्डा पडल्यासारखे दिसते.
  • घोट्याचा आकार वाढल्यामुळे शूज किंवा मोजे घालण्यात अडचण येते.

घोट्याला सूज का येते?

  1. दुखापत

जनरल फिजिशियन डॉ. तुषार तायल यांच्या हवाल्याने हेल्थशॉट्सने दिलेल्या माहितीनुसार, पायाला किंवा घोट्याला दुखापत झाल्यास सूज येऊ शकते. जेव्हा चालताना, धावताना घोटा किंवा पाय लचकतो तेव्हा होणारी दुखापत ही अस्थिबंधनांवर (हाडांना सांधून ठेवणाऱ्या लिगामेंट्स) ताण वाढवते व परिणामी सूज येऊ शकते.

  1. संधिवात

संधिवातामुळे सुद्धा पायाला सूज येऊ शकते. ऑस्टियोआर्थरायटिस हा वारंवार होणारा संधिवात आहे ज्यामुळे सूज येऊ शकते. तसेच संधीरोग हा आणखी एक प्रकारचा संधिवात आहे ज्यामुळे सांधे दुखतात. पायाचे मोठे बोट हे संधिवाताचे केंद्रस्थान असते पण हा विकार घोट्याच्या किंवा पायाच्या इतर सांध्यांवर देखील परिणाम करू शकतो.

  1. लिम्फ (द्रव) साचणे

आपल्या शरीरात लिम्फ म्हणजे एकाप्रकारचे द्रव असते. जे शरीरातील पेशींमधून स्त्रवते व त्यात अनेक प्रकारचे प्रोटिन्स, मिनरल्स तसेच खराब झालेल्या पेशी, जंतू सुद्धा असतात. जेव्हा या लिम्फचे प्रमाण वाढते किंवा त्याच्या प्रवाहाला अडथळा येतो तेव्हा पायाच्या खालच्या भागात हे द्रव साचते. यूएसमधील १० हजारातील १००० लोकांना याचा त्रास होत असतो. जर्नल ऑफ वाउंड केअरमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे की हा त्रास अनुवांशिक सुद्धा असू शकतो.

  1. गर्भधारणा

गरोदरपणात अनेक कारणांमुळे गुडघे आणि पाय सुजतात, नैसर्गिक द्रवपदार्थ शरीरात साचून राहणे, गर्भाचे वजन आणि हार्मोनल चढउतार यासारख्या कारणांमुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊ शकतो. तुम्ही जर दिवसभर बसून किंवा झोपून असाल तर विशेषतः संध्याकाळी पाय सुजण्याची अधिक शक्यता असते. किडनी इंटरनॅशनल सप्लीमेंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे की, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत सुजलेले पाय आणि घोटे अधिक स्पष्ट दिसू शकतात. प्रसूतीनंतर सूज कमी होते.

  1. संसर्ग

काहीवेळा वेदना व लाल चट्ट्यांसह पायाला सूज येऊ शकते. पायाच्या बोटांच्या नखांच्या आसपास ही सूज येऊ शकते. असं होण्यामागे अनेकदा संसर्ग हे कारण असते. खेळाडूंच्या बाबत किंवा ज्यांचे पाय बराच वेळ बुटामुळे बंद असतात त्यांना नीट स्वच्छता न राखल्यास हा त्रास होऊ शकतो.

  1. हृदय, यकृत आणि किडनीच्या समस्या

घोट्याला येणारी सूज ही बऱ्याच अवधीनंतरही कमी होत नसेल तर कदाचित ही सूज हृदय, किडनी व यकृताच्या बिघाडाचे लक्षण असू शकते. उजव्या बाजूच्या हृदयाची कार्यक्षमता कमी होत असल्यास संध्याकाळच्या वेळी घोट्याला सूज येण्याचा त्रास उद्भवू शकतो. तसेच किडनी निकामी होतेवेळी सुद्धा पाय किंवा घोट्याला सूज येऊ शकते, याचे कारण म्हणजे जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा शरीरात द्रवपदार्थ जमा होऊ शकतात व त्यामुळे सूज येते. यकृतामध्ये बिघाड असल्याने अल्ब्युमिनचा स्त्राव कमी होऊ शकतो ( हा एक प्रोटीनचा प्रकार आहे जो रक्तवाहिन्यांमधून आसपासच्या ऊतींमध्ये रक्त जाण्यापासून प्रतिबंधित करतो) परिणामी द्रव गळती होऊ शकते. गुरुत्वाकर्षणामुळे पाय आणि घोट्यामध्ये द्रव पोहोचते पण काही वेळा ते पोट आणि छातीमध्ये देखील जमा होऊ शकते.

याशिवाय काहींचे पाय हे अगदी सपाट असतात तर काहींच्या पायाच्या तळव्याला थोडी कमान असते याचा सुद्धा परिणाम सूज येण्याच्या स्वरूपात दिसू शकतो पण याबाबत अजून संशोधन होण्याची गरज आहे असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

घोट्याला सूज येणे कसे थांबवावे?

नियमित व्यायाम केल्याने किंवा निदान चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते व पायामध्ये द्रव साचून राहत नाही. आपण सकाळी एकदा काम सुरु करण्यापूर्वी चालल्यास, धावल्यास किंवा योगासने केल्यास ऊर्जा सुद्धा टिकून राहू शकते.

बैठ्या जीवनशैलीची सवय मोडा, अगदी तुमचं काम जरी बसून असेल तरी कामाच्या मध्ये थोडा ब्रेक घेऊन चाला. पण हो हे ही लक्षात घ्या की फार वेळ उभे राहणे सुद्धा योग्य नाही त्यामुळे जर तुमच्या कामासाठी उभं राहावं लागत असेल तर मध्ये ब्रेक घेऊन थोडं बसून घ्या.

जास्त वजनामुळे तुमच्या नसांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, ज्यामुळे सूज येऊ शकते. त्यामुळे संतुलित आहेत व व्यायामासह निरोगी वजन राखा.

पायाला नीट आधार देणारे शूज वापरल्यास तुमच्या घोट्या आणि पायांवरचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

तुमच्या आहारातील सोडियम कमी केल्याने द्रवपदार्थ टिकून राहण्यास मदत होऊ शकते. अर्थात आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाका असा याचा अर्थ होत नाही पण प्रमाण मर्यादित असावं.

हे ही वाचा<< कोमट पाण्यात सैंधव मीठ व ‘या’ बियांची पूड घालून प्यायल्याने खूप खाऊनही वजन राहील आटोक्यात? पोट स्वच्छ करणारा उपाय वाचा

विश्रांती घेत असताना, द्रव निचरा होण्यासाठी तुमचे पाय थोडे उंचावर ठेवा, ज्यामुळे घोट्याला सूज येण्याचा त्रास कमी होऊ शकतो.

घोट्याची सूज कशी कमी करावी?

  • कॉम्प्रेसिंग मोजे किंवा स्टॉकिंग्ज घाला.
  • चालणे किंवा पोहणे यासारख्या शारीरिक हालचाली करा
  • १५ – २० मिनिटांसाठी सुजलेल्या ठिकाणी थंड पॅक किंवा कापडात गुंडाळलेला बर्फ लावा.
  • मिठाचे सेवन कमी करा आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा वापर वाढवा.
  • तुमच्या पायांमधून द्रव काढून टाकण्यासाठी, विश्रांती घेताना तुमचे पाय तुमच्या हृदयाच्या पातळीच्या वर उंच ठेवा.
  • रक्ताभिसरण वाढवण्यासाठी पायांचे व्यायाम करून पहा.
  • विमान किंवा ट्रेनने प्रवास करताना रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, योग्य तितका वेळ बसा व उभे राहा
  • मांड्यांभोवती घट्ट कपडे घालणे टाळा.

घोट्याला किंवा पायाला सूज येण्याचा त्रास वारंवार होत असल्यास आपण आपल्या स्थितीशी परिचित तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.