तुम्हाला सतत आळसल्यासारखे होतंय का, काहीच करण्याचा उत्साह वाटत नाहीये का… असे वाटत असेल तर पोहणे हा तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. रोज पोहण्याचा व्यायाम करणाऱयांचा आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले.
ब्रिटिश गॅस स्विमब्रिटन या संस्थेने केलेल्या संशोधनातून ही गोष्ट पुढे आली आहे. आपल्या घरानजीकच्या जलतरण तलावात किंवा नदीमध्ये रोज पोहण्यासाठी जाणाऱया व्यक्ती आनंदी आणि तंदुरुस्त असतात, असे आढळून आले. त्याचबरोबर या व्यक्ती आजूबाजूच्या परिस्थितीकडे अतिशय सकारात्मक पद्धतीने बघतात. रोज येणाऱया आव्हानांना कणखरपणे सामोरे जातात, असे संशोधनात आढळून आले. चार आठवड्यांसाठी करण्यात आलेल्या संशोधनातून रोज पोहणाऱया व्यक्तीच्या सकारात्मक दृष्टिकोनात ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.
रोज पोहणाऱयांना रात्री शांत झोप लागते. त्याचबरोबर त्याचा उत्साहही इतरांच्या तुलनेत जास्त असतो. त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या अशा व्यक्ती तंदुरुस्त असतात. त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाणही अत्यंत कमी असते, असेही संशोधनाच्या निष्कर्षामध्ये आढळले. रोजच्या रोज पोहण्याला सुरुवात केल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम संबंधित व्यक्तीवर दिसू लागतो, असेही संशोधनातून दिसले.
आनंदी जगायचंय? पोहायला जा!
तुम्हाला सतत आळसल्यासारखे होतंय का, काहीच करण्याचा उत्साह वाटत नाहीये का... असे वाटत असेल तर पोहणे हा तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे.
आणखी वाचा
First published on: 23-06-2014 at 10:45 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swimming key to happiness study