भारतात सौंदर्य प्रसाधनांना मोठी मागणी आहे. मोठ्या ब्रँडबरोबरच असंख्य लोकल ब्रँडसचाही सुळसुळाट पहायला मिळतो. अगदी लोकलमध्येही लिपस्टीक, नेलपेंट, काजळ आणि आयलायनर विकणारे सर्रास दिसतात. अनेकदा तर सौंदर्य प्रसाधनांच्या जहिराती पाहूनच आपल्याला त्याची भुरळ पडते आणि आपण काहीच न करता बाजारात जाऊन हे उत्पादन लगेच खरेदीही करतो. मात्र अशाप्रकारे सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करणे आरोग्याच्यादृष्टीने घातक ठरु शकते. त्यामुळे या उत्पादनांची योग्य ती शहानिशा करुन, त्यातील घटकांची माहिती घेऊन मगच ती खरेदी करायला हवीत. कमी किंमतीत आपल्याला हवे तसे काही मिळतंय म्हणून केलेली घाई त्वचेसाठी अपायकारक ठरु शकते. सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौंदर्यप्रसाधनांवरील सूचना आवर्जून वाचा

विशिष्ट सौंदर्यप्रसाधन कसे वापरावे, कोणती काळजी घ्यावी. यांसारख्या सूचना त्या सौंदर्यप्रसाधनावर दिलेल्या असतात. काही प्रसाधने लावून उन्हात जाऊ नये किंवा एखादे सौंदर्यप्रसाधन लावून खूप उन्हात गेल्यास त्याचा त्रास होऊ शकतो अशा सूचना त्यावर दिलेल्या असतात. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या सूचनांबाबत माहित नसल्याने चेहऱ्याची आग होणे, रॅशेस येणे असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे उत्पादनाच्या बॉक्सवर किंवा प्रत्यक्ष उत्पादनावर लिहीलेल्या सूचना योग्य पद्धतीने वाचणे महत्त्वाचे आहे.

त्वचारोगतज्ज्ञांची मान्यता आहे का पहावे

नामवंत ब्रँडच्या उत्पादनांवर विशिष्ट उत्पादन त्वचारोगतज्ज्ञांची मान्यता असल्याचे तसेच त्यांनी या उत्पादनाची तपासणी केल्याचे लिहीलेले असते. आपण खरेदी करत असलेल्या उत्पादनावर अशाप्रकारची माहिती आहे का ते तपासून पहावे.

उत्पादनातील घटक लक्षात घ्यावेत

आपण वापरत असलेली लिपस्टीक, कॉम्पॅक्ट, काजळ यांमध्ये कोणते घटक वापरले आहेत याबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या त्वचेला एखादा घटक चालणार नसेल आणि तो घटक त्या उत्पादनात असेल तर त्याच्या वापराने आपल्याला अॅलर्जी होऊ शकते. अशाप्रकारे योग्यरितीने न पाहता उत्पादन खरेदी केल्यास आपले पैसेही विनाकारण वाया जातात.

एक्सपायरी डेट तपासून घ्या

खाण्याच्या एखाद्या पदार्थाची किंवा औषधांची खरेदी करताना आपण त्याची एक्सपायरी डेट तपासून मगच ते उत्पादन खरेदी करतो. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेशी थेट संपर्कात येणारी सौंदर्यप्रसाधने घेताना त्यांची एक्सपायरी डेट पाहणे आवश्यक आहे. ही एक्सपायरी डेट जवळ आली असेल किंवा उलटून गेली असेल, तर अशी सौंदर्यप्रसाधने वापरल्यास आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो.