How to make energy booster: जर तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर झोप येत असेल आणि दिवसभर थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात अनेक खनिजांची कमतरता असू शकते. खरंतर हे अशक्तपणाचे लक्षण असू शकते. परंतु ही समस्या अनेक दिवसांपासून अशीच राहिल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दुधाबरोबर एनर्जी पावडर घेतल्याने या सर्व समस्यांपासून आणि अशक्तपणापासून सहज दूर राहू शकता.

एनर्जी बूस्टर का घ्यावे?

बाजारात अनेक एनर्जी बूस्टर उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही तुमच्या घरी सहज एनर्जी बूस्टर पावडर बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये दुधाबरोबरही ती घेऊ शकता. ही पावडर बनवण्यासाठी मखाणे, काजू, बदाम, हरभरा आणि गूळ यांचा वापर केला जातो. वास्तविक, सुक्या मेव्यापासून बनवलेल्या या एनर्जी बूस्टर पावडरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला संपूर्ण पोषण देण्यासोबतच शरीराला ऊर्जा देते आणि शरीराचे आरोग्य सुधारते.

how to get rid of shoe smell instantly
तुमच्या शूजमधून येणारी दुर्गंधी काही मिनिटांत होईल गायब, फॉलो करा फक्त ‘या’ ५ सोप्या टिप्स
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
really fasting between 5.30 pm and 10 am is best for belly fat loss
सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न खाणे पोटावरचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
Despite government announcement smart prepaid meters are being distributed secretly causing unemployment for contract meter readers
राज्यभरात यंदा वीज देयक वेळेवर नाही… संतप्त कंत्राटी मीटर वाचक…
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Safety demonstration at fuel storage depot in Miraj sangli news
मिरजेतील इंधन साठवण आगारात सुरक्षा प्रात्यक्षिक
winter kitchen tips 5 time saving breakfast hacks
Winter Kitchen Tips : हिवाळ्यात नाश्ता बनवताना आळस येतोय? मग वापरा ‘या’ ५ स्मार्ट कुकिंग टिप्स

एनर्जी बूस्टर पावडर बनवण्यासाठी साहित्य

  • २५० ग्रॅम मखाना
  • १५० ग्रॅम काजू
  • १५० ग्रॅम बदाम
  • २०० ग्रॅम भाजलेले हरभरे
  • ५० ग्रॅम तीळ
  • गूळ

हेही वाचा: त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

एनर्जी बूस्टर पावडर कशी बनवायची?

एनर्जी बूस्टर पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम मखाणे घ्या आणि ते तूपात हलके भाजून घ्या. त्यानंतर काजू आणि बदामही हलके भाजून घ्या. काही वेळाने तीळ मंद आचेवर भाजून घ्या. आता हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये टाका. त्यानंतर आता त्यात भाजलेले हरभरे घालून तुमच्या चवीनुसार त्यात गूळ घाला. अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी एनर्जी बूस्टर पावडर सहज बनवू शकतो. ही एनर्जी बूस्टर पावडर दुधात मिक्स करून दररोज घ्या.

Story img Loader